‘माझा युरोप प्रवास’ हे अशोक केसरकर यांनी खुमासदार शैलीत लिहिलेले प्रवास वर्णन आहे. डोळ्यांनी टिपलेले मनाला भावलेले अनुभव केसरकर यांनी अत्यंत साध्या भाषेत लिहिले आहे. या पुस्तकात त्यांनी अनुभवलेली परदेश वारी कथन केली आहे. प्रत्यक्ष जाण्याची तयारी कशी केली ते तिथे गेल्यावर काय घडले याचे चित्रमय वर्णन त्यांनी केले आहे. हे पुस्तक युरोपला जाण्याची उत्सुकता वाचकांच्या मनात निर्माण करते. युरोपला जाण्याआधी आवर्जून वाचायला हवे असे हे पुस्तक एक मार्गदर्शक म्हणून काम करते. अतिशय कलात्मक मांडणीतून आणि प्रत्यक्ष आलेल्या अनुभूतीतून त्यांनी प्रामाणिकपणे या पुस्तकातून आपल्या अनुभवांचा खजिना वाचकांसाठी उपलब्ध करून दिला आहे. लंडनपासून रोमपर्यंतचा केसरकर दांपत्यांचा साधारण 19 दिवसांचा प्रवास हा अतिशय सुखद सुंदर आणि संपन्न करणारा आहे. केसरकरांच्या साध्या आणि चपखल वर्णनांनी वाचक त्या त्या ठिकाणांचा अनुभव घेऊ शकतो. लेखकाविषयी : सत्तरी ओलांडलेले अशोक केसरकर यांनी व्यापार शास्त्रात शिक्षण घेतले काही काळ त्यांनी प्राथमिक शिक्षक म्हणून काम केले. डेक्कन स्पिनिंग मिल या सहकारी सूतगिरणीत त्यांनी वीस वर्षे काम केले. नोकरी करता करता त्यांनी मराठी आणि इंग्रजी माध्यमातील अनेक मुलांना घडविले. ‘शंभर धागे सुखाचे’ ‘धगधगते अग्निकुंड’ आणि ‘ज्ञानमार्गीचा सांगाती’ असे तीन चरित्रग्रंथ त्यांनी लिहिले. एका स्थानिक साप्ताहिकातून ‘जाता-जाता’ हे सदर त्यांनी बारा वर्षे लिहिले. त्यातूनच त्यांचे ‘ जसं सुचलं तसं’ हे पुस्तक प्रकाशित झाले. तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमात ते व्याख्यानेही देतात.
Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.