आपल्यादेशात खर्या इतिहासाची किती उणीव आहे हे सांगावयास नको. पाश्चात्त्यांनी लिहिलेलेइतिहास सर्वांशी चांगले व मनाचे समाधान होण्याजोगे नाहीत असे म्हटल्यावाचनू राहवतनाही. याचे कारण एक तर त्या लोकास आपल्या देशस्थितीची पूर्ण माहिती होणे कठीण आहे वदुसरे असे की जितके इंग्रजी ग्रंथकारांनी इतिहास लिहिले आहेत तितके साहजिकच एकपक्षीझाले आहेत. सारांश हिंदू लोकांच्या दृष्टीने हिंदुस्थानच्या इतिहासाची उणीव कोणीतरीहिंदू इतिहासकार निपजल्यावाचून दूर व्हावयाची नाही हे निर्विवाद आहे. असा बुद्धिमानव्यासंगी व अधिकारी पुरुष केव्हा निपजेल तो निपजो. परंतु आपल्या हाती असणारी इतिहासाचीसाधने जमा करून ठेवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे व त्याप्रमाणे अनेक लोकांनी छापलेल्याग्रंथांतून अशी माहिती आजवर उपलब्ध झाली आहे हे आपल्यास भूषण मानण्याजोगे आहे.सन1857 सालचे बंडाचे जे इंग्रजी इतिहास झाले आहेत ते वरील प्रकारचे आहेत. के. मालिसनवगैरे इतिहासकारांनी जे मोठाले इतिहास लिहून ठेवले आहेत ते सर्व एकपक्षी आहेत. त्यातबंड इंग्रजांच्या कोणत्या चुकीमुळे उद्भवले साहेब लोक ठिकठिकाणी कसे मारले गेले थोड्यालोकांनी मोठ्या शौर्याने आपले प्राण कसे वाचविले व पुढे इंग्रजांनी दिल्ली लखनौकानपूर वगैरे शहरे कशी हस्तगत केली इत्यादि हकिकती सविस्तर रीतीने वर्णन केल्या आहेत.परंतु बंडापूर्वी हिंदू लोकांच्या समजुती काय झाल्या होत्या; नानासाहेब झाशीवालीलखनौची बेगम इत्यादि लोकांनी बंडाकरिता काय उद्योग केले; ते आपले ठिकाणी कसे वागत होते;त्यांस पुढे दु:खे कोणती व काय कारणाने भोगावी लागली; अक्कल धैर्य शौर्य क्रूरपणामूर्खपणा इत्यादि निरनिराळे गुण त्यांच्या ठिकाणी कसे दिसून आले व रयतेस बंडाच्या दिवसांतकिती संकटे भोगावी लागली याजविषयी त्यांच्या ग्रंथांतून कोठेच वर्णन नाहीत. हे साहजिकआहे की याजविषयी त्यास माहिती नसावी व असली तर क्वचित् प्रसंगी पायोनियरसारख्या पत्रातThe tiger instincts of an Imperial race चिथवूं नका नाहीतर आम्ही 1857 सालाप्रमाणेFire and sword चालवूं’असे उद्गार निघतात; तथापि वरील गोष्टीचे वर्णन आपल्या ग्रंथात करणे त्यास योग्य वाटतनाही. अशा स्थितीत या अशा गोष्टींविषयी आपल्या लोकांनी प्रत्यक्ष पाहून लिहिलेल्याहकिकतीच उपयोगी पडणार आहेत. प्रत्यक्ष पाहून किंवा विश्वसनीय लोकांपासून ऐकून सविस्तरलिहून ठेवलेली त्या त्या वेळची हकिकत हे एक भावी इतिहासाचे महत्त्वाचे साधन आहे. सन1857 सालासंबंधेच कित्येक साहेब लोकांनी आपआपल्या हकिकती किती मनोवेधक रीतीने लिहिल्याआहेत व त्या के. मालिसन इत्यादी इतिहासकारांस कशा उपयोगी पडल्या आहेत हे इंग्रजी वाचकासठाऊकच आहे. अशा प्रकारची एक हकिकत एका विद्वान भिक्षुक प्रेक्षकाने लिहून ठेवली आहेती भावी इतिहासकारास उपयोगी पडेल अशा हेतूने या पुस्तकात मी वाचकांपुढे मी ठेवीत आहे. 'माझा प्रवास अथवा 1857 सालच्या बंडाची हकिकत’ हे लिखाण कै.चिंतामणरावजीवैद्य यांनी संपादून प्रसिद्ध केले तेव्हापासूनच गेली 40 वर्षे त्या योगाने मराठी भाषेतचनव्हे तर 1857 साली घडलेल्या धामधुमीच्या इतिहासात उत्कृष्ट भर पडल्याचे समाधान जाणत्याजनतेकडून व्यक्त झालेले आहे. कै.वैद्यांनी हे पुस्तक 1907 साली म्हणजे 1857 सालानंतर50 वर्षे उलटताना प्रसिद्ध केले.
Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.