माझ्या निवडक कविताहा बिलकुल प्रासंगीक काव्य प्रवास नसूनगेल्या तीन दशकात जे-जे मला भावले सूचले आठवले व मनाला पटले ते-ते शब्द-बद्ध करण्याचा मोह मी आवरू शकलो नाही. त्यातूनच माझा हा काव्य प्रवास सुरू झालेला आहे ..! आजवर मी शेकडो कविता लिहिल्या... त्यातल्या काही लातूर येथील दै. एकमतदै. युवा छत्रपती लातूर व इतर दैनिकांतून मराठा मार्ग व नेक मराठा नागपूर तसचे विविध साप्ताहिक व पाक्षिकातून छापूनही आलेल्या होत्या. भारत अंतरिक्ष कन्या कल्पना चावला यांच्या दुर्दैवी अपघातावर लिहिलेली कविता असो वा अमेरिका -इराक तणाव प्रसंगात तत्कालीन अध्यक्ष बुश यांचेवर लिहिलेली युद्धखोर बुश महाराष्ट्रातील प्रख्यात व्याख्याते व तत्कालिन मराठवाडा विद्यापिठाचे कुलगुरू आदरणीय प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या निधनानिमित्य लिहिलेली दै. सकाळ. लातूर आवृतीमध्ये छापून आलेली कविता असो..यामुळे मला कविता लिहिण्याचा छंद जडला.. राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जिवन पटलावर १९ फेब्रु.2००७ मध्ये लिहिलेल्या६४ कविता ज्याला मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध कवी कै. जगदिश खेबुडकर यांनी प्रस्तावना लिहिलेली होती. आज सहजगत्या कुठल्यीही विषयावरची कविता लिहिणे हा व्यासंग जडला आहे. साहित्य कृषी व शेतकरी जिवनावरच्या व्यथा मांडणे असो वा ग्रामिण जिवन इतिहास समाजकारण राजकारण अर्थकारण शिक्षण आरक्षण महागाई पर्यावरण इ.आवश्यक वाटणार्या इ. विषयांवर... कविता मराठी वाचकांना ..नक्किच पसंत पडतील ही धारणा आहे..! सातत्याने लिहित राहावे व साहित्याद्वारे मराठी रसिक वाचकांपर्यत जावे हाच ध्यास घेऊन ही सेवा करत रहावी ही उत्कंठा उरी बाळगलेली आहे..! प्रा. उद्धव हरिभाऊ कोळपे -जाधव हरिकलापद्मा नगर लातूरमहाराष्ट्र.
Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.