*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹441
₹500
11% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
‘माझी वाटचाल : मेटकॉफ हाउस ते राजभवन (१९५२ – १९८९)’ हे माजी सनदी अधिकारी आणि अरुणाचलचे माजी राज्यपाल राम प्रधान यांचं आत्मचरित्र आहे. या आत्मचरित्रातून त्यांनी त्यांच्या व्यावसायिक आणि कौटुंबिक वाटचालीचा आढावा घेतला आहे. प्रधान यांचा जन्म २७ जून १९२८ रोजी मुंबईत दादर येथे झाला. त्यांचे वडील दत्तात्रेय मिलिटरी अकाउन्ट्समध्ये क्लार्वâ होते. त्यांचे आजोळ नागोठाणे येथे होते. राम प्रधान यांचं मुंबईतील बालपण त्यानंतर त्यांच्या वडिलांना सुपरिंटेन्डंट पदावर बढती मिळून त्यांची दिल्लीला झालेली बदली त्यानंतर दिल्लीतील वास्तव्याचे अनुभव असिस्टंट अकाउन्ट जनरल म्हणून त्यांच्या वडिलांची दिल्लीहून पुण्याला झालेली बदली पुण्यात न्यू इंग्लिश स्वूâल नानावाडा येथे त्यांचं झालेलं शालेय शिक्षण त्यानंतर फग्युर्सन महाविद्यालयातून पदवीपर्यंतचं शिक्षण गणित घेऊन बी. ए. केल्यानंतर मुंबईला एम. ए. (संख्याशास्त्र )साठी घेतलेला प्रवेश; पण आईच्या आजारपणामुळे एम.ए. अध्र्यावरच सोडावं लगणं त्यानंतर आईचा झालेला मृत्यू त्यानंतर गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेत नॅशनल सॅम्पल सव्र्हेच्या प्रकल्पात काम करण्यासाठी रुजू होणे त्याचदरम्यान स्पर्धा परीक्षेला बसण्याचा घेतलेला निर्णय आणि आय.सी.एस. झाल्यानंतर प्रशिक्षणासाठी दिल्लीच्या मेटकॉफ हाऊसमध्ये मिळालेला प्रवेश या टप्प्यापर्यंतची वाटचाल सुरुवातीला प्रधानांनी सांगितली आहे. यानंतर आय.सी.एस. प्रशिक्षणादरम्यानचे अनुभव त्यांनी कथन केले आहेत. त्या प्रशिक्षणादरम्यान त्यांना व्याख्यान द्यायला आलेले नामवंत उच्चपदस्थ त्यापैकी लक्षात राहिलेल्या व्यक्ती आणि त्यांची व्याख्यानं प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून दिल्लीच्या आसपासच्या विविध गावांना दिलेल्या भेटीतून प्रशासकीय अधिकाNयांसमोर कोणती आव्हानं असतात याचा आलेला प्रत्यय आणि प्रशिक्षणातील इतर बाबींबाबतही त्यांनी तपशीलवारपणे लिहिलं आहे. प्रशिक्षणाचाच भाग म्हणून भारतीय सैन्याबरोबर घालवलेल्या काही दिवसांबाबतही त्यांनी तपशीलाने लिहिलं आहे. त्यादरम्यान त्यांच्यावर ओढवलेल्या जीवघेण्या संकटांबद्दल त्यांनी सांगितलं आहे. प्रशिक्षणासाठी केलेल्या देशाटनाचे विविध अनुभव त्यांनी शब्दबद्ध केले आहेत. प्रशिक्षणाच्या शेवटच्या टप्प्यात १५ ऑगस्टचा ध्वजवंदनाचा कार्यक्रम आणि २६ जानेवारीची परेड यासाठी तिन्ही सैन्यदलांच्या अकिाNयांबरोबर केलेलं काम संसद भवनात घालवलेले काही दिवस प्रशिक्षण सुरू असतानाच गडकNयांच्या मुलीशी विवाह करण्याचा घेतलेला निर्णय इ. घटनांबाबत त्यांनी लिहिले आहे आणि त्यांच्या वडिलांना आणि भावंडांना त्यांनी लिहिलेल्या पत्रांचाही त्यांनी समावेश केला आहे. प्रशिक्षण संपल्यानंतर ते मुंबईला राज्य सरकारच्या सेवेत रुजू झाले. त्या सेवेत आलेले अनुभव आणि ती सेवा बजावत असताना भेटलेल्या महत्त्वाच्या आणि इतर व्यक्ती यांच्याबाबत त्यांनी सांगितले आहे. त्यानंतर अहमदाबाद येथे जिल्हाधिकारी म्हणून ते रुजू झाले. जिल्हाधिकारी म्हणून काम करताना त्यांना आलेले अनुभव त्यांनी शब्दबद्ध केले आहेत. तसेच तेथील वास्तव्यात भेटलेल्या व्यक्तींविषयी त्यातील काहींशी जुळलेल्या ऋणानुबंधांविषयीही त्यांनी लिहिले आहे. छोट्या गावांमध्ये कामासाठी केलेली भटवंâती भटवंâती करत असताना पत्नीबरोबरचे सहजीवन आणि त्या भटवंâतीतील वेगवेगळे अनुभव याबद्दल त्यांनी निवेदन केलं आहे. बनासकांठा (पालनपूर संस्थान) इथे जिल्हाधिकारी म्हणून काम करत असतानाचे अनुभव त्यांनी सांगितले आहेत. त्यानंतर पुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारीपदी त्यांची नियुक्ती झाली आणि त्यादरम्यान माउंट अबू येथील एका मोठ्या परिषदेच्या आयोजनाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. ती त्यांनी इतकी उत्तम रीतीने पार पाडली की यशवंतराव चव्हाण त्यांच्यावर खूश झाले आणि त्यांनी कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी म्हणून प्रधानांना नियुक्त केले. कोल्हापूरच्या कार्यकाळात त्यांनी महालक्ष्मी मंदिराच्या जीर्णोद्धाराचं महत्त्वाचं काम केलं आणि त्याबरोबरच अन्यही महत्त्वाची कामे केली. त्याचा आढावाही त्यांनी दिला आहे. कोल्हापूरने त्यांना अनुभवसमृद्ध केलं आणि तेथील लोकांनीही त्यांना खूप प्रेम दिलं. त्यानंतर यशवंतराव चव्हाणांचे खासगी सचिव म्हणून त्यांची नियुक्ती झाली. मुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणून काम करतानाचे अनुभव आणि यशवंतरावांची काम करण्याची पद्धत याबद्दल त्यांनी लिहिलं आहे. त्यानंतर त्यांनी संरक्षण मंत्र्यांचे खासगी सचिव म्हणूनही काम पाहिले. त्यानंतर वाणिज्य मंत्रालयात उपसचिव पदाचा भार त्यांनी सांभाळला. हे काम करताना कामाचा भाग म्हणून त्यांना परदेश दौरेही करायला लागले. त्या परदेश दौNयांच्या आठवणीही त्यांनी सांगितल्या आहेत. त्यानंतर महाराष्ट्र सरकारमध्ये गृहसचिव म्हणून त्यांची नियुक्ती झाली. सागरी वाहतूक संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले. महाराष्ट्राचे मुख्य सचिव पदही त्यांनी भूषविले. भारत सरकारच्या गृहसचिव पदाची धुरा त्यांनी सांभाळली. ३० जून १९८६ रोजी प्रशासकीय सेवेतून ते निवृत्त झाले; मात्र १९८७मध्ये अरुणाचलच्या राज्यपाल पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली. पं. नेहरूंचा मृत्यू इंदिरा गांधींचा मृत्यू जयप्रकाश नारायण यांचा मृत्यू आसाम करार पंजाबमधील पेच इ. अनेक ऐतिहासिक घटनांचे ते साक्षीदार ठरले. यशवंतराव चव्हाण बाबासाहेब भोसले शरद पवार वसंतदादा पाटील या मुख्यमंत्र्यांबरोबर त्यांनी काम केलं. काही वेळेला वादाचे प्रसंगही उद्भवले. तसेच जवाहरलाल नेहरू इंदिरा गांधी राजीव गांधी यांच्याबरोबरही त्यांनी काम केलं. एवूâणच एका प्रशासकीय अधिकाNयाच्या अनुभवांचा हा विस्तीर्ण पट मुळातून वाचण्यासारखा आहे. प्रशासकीय सेवेत काम करणाNयांसाठी तर तो उपयुक्त आहेच; पण सर्वसामान्य माणसांच्या ज्ञानात भर घालणारा आहे. तेव्हा प्रत्येकाने हे पुस्तक आवर्जून वाचलं पाहिजे.