इंग्लिश भाषेतील सर्वाधिक लोकप्रिय लेखक आणि सव्यसाची पत्रकार श्री. खुशवंतसिंग यांचं मराठीत अनुवाद झालेलं हे पहिलंच पुस्तक आहे.आपल्या प्रदीर्घ आणि वैविध्यपूर्ण अनुभवांनी समृद्ध अशा आयुष्यात वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या वळणांवर भेटलेल्या काही महत्त्वाच्या स्त्री-पुरुषांच्या खुशवंतसिंगांनी अत्यंत मोजक्या आणि नेमक्या शब्दांत चितारलेल्या अर्कचित्रांचा हा वैशिष्ट्यपूर्ण संठाह आहे. यात राजकारणी आहेत उद्योगपती आहेत वकील आहेत सनदी नोकरी आहेत लेखक आहेत चित्रकार आहेत आणि अशाच अनोळखी परंतु तथाकथित उच्चभ्रू व्यक्तीही आहेत.धारदार औपहासिक आणि कोणताही आडपडदा न ठेवणारं हे थेट लेखन त्यांनी लेखनासाठी निवडलेल्या व्यक्तींच्या व्यक्तिमत्त्वाचे आजवर केवळ अज्ञात असलेले कंगोरे उलगडून दाखवतं त्याचबरोबर व्यामिश्र मानवी मनाचा शोध घेण्याची अंतर्दृष्टीही वाचकाला प्रदान करतं.कधी मनाला गुंगवणारं कधी अस्वस्थ करणारं तर प्रसंगी प्रक्षुब्ध करणारं हे व्यक्तिदर्शन एकदा वाचलंच पाहिजे असं सरस उतरलं आहे.
Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.