श्रीराम पवार लिखित या पुस्तकात सत्तेत आलेल्या ‘एनडीए’ अर्थात भाजपचे वर्चस्व कसे भारतात आले हे त्यांनी संदर्भासहित मांडले असून मोदी आणि त्यांचे निकटचे सहकारी अमित शाह यांनी स्वतःचे कौशल्य पणाला लावून २०१४ आणि २०१९ च्या निवडणुका कशा जिंकल्या याची माहितीपूर्ण गोष्ट सांगितली आहे. सत्तेत येण्यासाठी देशभरात कसे वातावरण तयार केले गेले कुठल्या कल्याणकारी योजना थेट जनतेत मांडण्यात आला याचा संपूर्ण वेध ‘मोदी २.० वैचारिक स्वप्नपूर्तीची दिशा या पुस्तकात श्रीराम पवार यांनी उदाहरणासह मांडला आहे. राजकारणाचे पारंपरिक आधार मोदींनी कसे बदलले त्यातून त्यांनी सत्ता कशी मिळवली आणि ती पुढच्या निवडणुकीतही कशी टिकवली याचा स्वतंत्रपणे वेध या पुस्तकातून घेतला आहे. भाजप सरकार सत्तेत आल्यावर त्यांनी कोणते राजकीय आणि सामाजिक निर्णय घेतले आणि त्याचा फायदा त्यांना कसं झाला याचेही विवेचन पुस्तकात केले आहे. एक दीर्घकालीन वैचारिक अजेंडा प्रत्यक्षात आणण्यासाठी केलेली व्यूहरचना आणि त्या विरोधातील भूमिका अधिक तीव्र होण्याच्या काळातील लढाई हे पुस्तक मांडत मांडत आहे. या पुस्तकातील मूळ लेख सकाळच्या ‘सप्तरंग’ या पुरवणीत ‘करंट अंडरकरंट’ या सदरात प्रकाशित झालेले आहेत. लेखकाविषयी : श्रीराम पवार हे प्रसिद्ध पत्रकार व राजकीय विश्लेषक असून सध्या सकाळ माध्यम समूहाचे संपादक संचालक म्हणून ते कार्यरत आहेत. त्यांनी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घटना-घडामोडींचे तसेच देशभरातील निवडणुकांचे दीर्घकाळ अभ्यासपूर्ण वार्तांकन केले आहे. राजकीय सामाजिक सहकार आर्थिक क्षेत्रांसह नागरीकरण पर्यावरण दहशतवाद आदी विषयांवर ते सातत्याने लेखन करत असून शोधपत्रकारिता आणि विश्लेषणात्मक लेखनासाठी ते परिचित आहेत.
Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.