*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹141
₹155
9% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
About the Book: मोतियाची फुले कवी मन सर्व ऋतूत येणाऱ्या प्रसंगाला हसतमुख सामोरे जाणाऱ्या अनुभवाचे चित्रण करते. जीवन तत्वांची कास धरत चुकत-माकत शिकत पुढे जात अंतर्मनाचा शोध घेणारी कविता आपल्या समोर उलगडत जाते. कवी बालगोपालांपासून तरुण ज्येष्ठ अश्या सर्व वयोगटाच्या व सर्व सामाजिक थरांतील अनुभव काव्यबद्ध करत असताना विशेषत: लय ताल आणि लोक गीतात सहज रमताना व त्यातील आनंद वाचकांना मुक्तहस्ते वाटताना सुख पावतो. आयुष्यातील संकटांना तोंड देताना खंबीर असणारा कवी समाजातील अज्ञानामुळे येणाऱ्या विकृतींवर कठोर आघात करताना कचरत नाही. लवकरच सर्वांच्या उत्तम भविष्याचे स्वप्न साकारणार आहे त्यादृष्टीने सार्थक प्रयत्न करण्याचे मार्गदर्शक आवाहन कविता करते. कवितेतून आशावादाचा स्रोत नकळतच झळकतो.... About the Author: अँब्रोस चेट्टियार थोड्या वेगळ्या नावाची पण शुद्ध तुपात तळलेले उत्तम मराठी बोलणारी हसतमुख व्यक्ती. हाडाचा शिक्षक मनस्वी व्यक्ती. जन्म मुंबईचा. बालपण व उभे आयुष्य खार-मुंबई ठाणे येथे व्यतीत. कडूगोड अनुभवांनी समृद्ध असे आयुष्य. खडतर आयुष्याचे चटके खात कधी हळवे होत कधी खंबीरपणे परिस्थितीशी दोन हात करणारा हसतमुखाने सर्वांना भेटणारा. एरव्ही बालपणापासून घुम्या स्वभावाचा असलेला भावंडांच्या काळजी पोटी स्वतःला चार भिंतीत कोंडून घेणारा .. परिस्थितीला प्रश्न विचारत आयुष्याचे धडे गिरवत आपले अनुभव आपल्या कवितेला सांगणारा कोमलहृदयी शिक्षक. नवनवीन विचारांनी सतत ओसंडून वाहणाऱ्या बालकांमध्ये त्यांच्या आयुष्याला दिशा देण्याच्या प्राथमिक शिक्षणाच्या कार्यात आनंदाने रमणारा .