<p><span style=color: rgba(15 17 17 1)>पृथ्वीवर माणसाचं वास्तव्य म्हणजे एखाद्या विद्यालयात प्रवेश घेऊन अध्ययन करण्यासारखंच नव्हे का? हे जग म्हणजे एक विद्यालय... प्रत्येक जीव पृथ्वीवर येतो ते काहीतरी उद्दिष्ट घेऊनच... कोणी धैर्य शिकण्यासाठी येथे येतो तर कोणी तेजप्रेमाची अनुभूती मिळावी म्हणून... काही लोक द्वेष-मत्सराचे परिणाम जाणून घेण्यासाठी तर काही निर्भय होण्यासाठी. प्रत्येकासाठी येथे स्वतंत्र अभ्यासक्रम असून जीवन जगता-जगता यातील धडे आत्मसात करायचे असतात... परंतु नेमकं हेच विसरल्यामुळे माणूस निरर्थक गोष्टींमध्ये आपला वेळ दवडतो. भावी पिढींसाठी कोणता वारसा सोडायचा? किती लोकांना आपण मनापासून मदत करतो? आपल्या मृत्यूनंतर किती लोकांना दुःख होईल? यांवर मनन न केल्याने जीवनालाच धडा शिकवण्याची संधी मिळते... पण तोपर्यंत माणसाचं अर्धं आयुष्य संपलेलं असतं. सुप्त गुणांना वाव न देता विकसित होण्यापूर्वीच चिरडून टाकणं हीच खरी आपल्या जीवनाची शोकांतिका... वास्तविक मृत्यू' हा माणसाच्या जीवनप्रवासाचा अंत नसून महाजीवनाकडे' नेणारं प्रवेशद्वार आहे. मृत्यूविषयीचं ज्ञान माणसाला सकारात्मक आणि सुंदर बनवतं. म्हणून मृत्यूचं भय न बाळगता या जीवनातच जागृत झालात तर एक प्रसन्न पहाट आपली प्रतीक्षा करत असल्याचं जाणवेल. जीवनाचा मागोवा घेऊन अंतर्मुख करणारं आपला विकास घडवण्यासाठी पाऊल उचलायला शिकवणारं पृथ्वीलक्ष्याविषयीचं अमूल्य ज्ञान प्रदान करणारा हा ग्रंथ...</span></p>
Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.