<p><span style=color: rgba(15 17 17 1)>शारीरिक मृत्यूनंतरच्या जीवनासंबंधीचे हे पुस्तक सर्वप्रथम 1975 साली प्रकाशित झाले आणि त्याच्या लोकप्रियतेत आजवर खंड पडलेला नाही. डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर पुन्हा जीवनात परतलेल्या 100 लोकांचा अतिशय उत्कंठावर्धक अत्यंत वाचनीय असा हा विलक्षण अभ्यास आहे. ह्या सर्वजणांनी सांगितलेल्या मृत्यूच्या समीपच्या अनुभवांमध्ये कमालीचा सारखेपणा आहे. हे अनुभव इतके सकारात्मक आहेत की ते वाचल्यानंतर आपलं जीवन मृत्यू आणि त्यानंतरचे आत्मिक/आध्यात्मिक जग यांच्याकडे पहाण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो. 'मी तरंगत असल्याचं मला जाणवलं... मी वळून पाहिलं आणि खाली अंथरूणावर पडलेलं माझं शरीर मला दिसलं.' 'तिथे वेदनेचा मागमूसही नव्हता आणि इतकं मोकळं तणावरहीत यापूर्वी मला कधीच वाटलं नव्हतं खूपच छान होतं सगळं' 'अतिशय शांतता आणि नीरवतेची भावना व्यापून राहीली आणि माझ्या लक्षात आलं की मी एका बोगद्यातून जात आहे' 'खूपच उबदार भावना होती ती... आजवरची कधी न अनुभवलेली अत्यंत सुखकारक अवस्था मी अनुभवत होते.' ज्यांची प्रिय व्यक्ती काळानं हिरावून नेली आहे किंवा ज्यांना मृत्यू या घटिताविषयी उत्सुकता आहे अशा सर्वांसाठी 'जीवनानंतरचे जीवन' एक नवं दालन खुलं करतं... एक प्रकारचा विश्वास मनात जागवतं.</span></p>
Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.