*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹185
₹240
22% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
‘अद्याप न जन्मलेल्या बाळाच्या हृदयात प्राणघातक दोष...’ ‘नॉर्वेतील गोठलेल्या तलावात तासभर बुडालेली स्कीअर...’ ‘डॉक्टरांनी `व्हेजिटेबल ठरवलेला कोमातील रुग्ण...’ वीस वर्षांपूर्वी या सर्वांना वाचण्याची आशा नाही म्हणून मृत समजून सोडून दिलं असतं; पण अविश्वसनीय अशा नवीन वैद्यकीय प्रगतीमुळे हे सर्व जण आज जिवंत आणि धडधाकट आहेत. चित्त खिळवून ठेवणाNया या पुस्तकात न्यूरोसर्जन सीएनएनचे प्रमुख वैद्यकीय बातमीदार आणि लोकप्रिय पुस्तकांचे लेखक डॉ. संजय गुप्ता हे चमत्कार प्रत्यक्षात आणणाया असामान्य विज्ञानाचं इतिवृत्त नोंदवतात. जेव्हा मृत्यूपासून बचाव करण्याचा प्रश्न येतो तेव्हा मानवी शरीर ज्या प्रकारे कार्य करतं त्याविषयीच्या आपल्या समजुती हे अग्रेसर डॉक्टर आणि संशोधक कशा बदलून टाकतात त्याचे वास्तव जीवनातील केसेसवर आधारित असलेले थरारक वृत्तान्त डॉ. गुप्ता सादर करतात. पूर्वी जे रुग्ण मृत्युमुखी पडण्याची दाट शक्यता होती त्या रुग्णांचं जिवंत राहाण्याचं प्रमाण दिवसेंदिवस का वाढत आहे यावर ते प्रकाश पाडतात. पक्षाघात विंâवा हृदयविकाराच्या झटक्यानंतर कोमात गेलेल्या रुग्णांना वाचवण्यासाठीच्या रोगनिवारक हायपोथर्मिआच्या प्रयोगापासून ते गर्भाला जीवदान देणाNया शस्त्रक्रिया आणि रणांगणांवरील जखमी सैनिकांना वाचवण्याच्या उद्देशाने करण्यात येणाNया प्राण्यांमधील सुप्तनिद्रेच्या अभ्यासापर्यंतच्या या सर्व विलक्षण गोष्टी वाचून जीवन-मृत्यूच्या वास्तव स्वरूपाविषयीची आपली गृहीतवंâ पार पालटून जातात.