* नर-मादी ते स्त्री-पुरुष या पुस्तकामध्ये माणसाच्या वागण्यामागची मूळ कारणं प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे त्याच्या उत्क्रांतीत कशी दडलेली आहेत याचे विस्तृत विवेचन लेखक डॉ. मिलिंद वाटवे यांनी केले आहे. * उत्क्रांतीत केवळ शारीरिक घडणीत बदल होत नाहीत तर मानसिक सामाजिक बदल कसे घडून येतात; हे सांगितले आहे. * आज स्त्री-पुरुष संबंधांच्या कुठल्याही पैलूबद्दल बोलणं अशिष्ट मानलं जातं खरं तर मूळ भारतीय परंपरेमध्ये 'कामसूत्र'सारखा ग्रंथ अनेक मंदिरांवर असलेली प्रणयशिल्पं यामधून हा विषय उघडपणे मांडला जात होता. मध्ययुगीन कालखंडात यावर असलेली बंधनं मोडून वास्तववादी विचार मांडण्याचा धाडशी प्रयत्न पुस्तकामध्ये केला आहे. * अश्लीलता आणि सभ्यता यांच्यामध्ये एक पुसटशी रेषा असते; ती नक्की कशी याची तर्कसंगत मांडणी हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य! प्रा. डॉ. मिलिंद वाटवे हे संशोधक विज्ञानलेखक आणि विज्ञानशिक्षक म्हणून ४० वर्षांहून अधिक काळ कार्यरत आहेत. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगळुरू आणि आयसर पुणे या संस्थांमध्ये त्यांनी शिक्षण संशोधन व विज्ञानप्रसाराचे काम केले आहे. आदिवासी शेतकरी विद्यार्थी आणि सामान्य लोकांसह गेली अनेक वर्षे ते संशोधनाचे काम करत आहेत. विज्ञानकथा ललितलेखन अनुभवलेखन याबरोबरच त्यांचे मराठी आणि उर्दू कवितासंग्रह आणि संगीतरचनाही प्रसिद्ध झाल्या आहेत.
Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.