A MAGNIFICENTLY ILLUSTRATED COLLECTION OF THE LATE RAJIV GANDHI`S SAYINGS. राजीव गांधी भारताच्या राजकीय क्षितिजावर अल्पकाळ तळपून अचानक अस्तंगत झालेला एक तेजस्वी तारा. तथापि आपल्या पंतप्रधानपदाच्या मर्यादित कारकिर्दीतही राजीव गांधींनी देशहितासाठी अनेक प्रकारची विधायक कामे केली आणि जनमानसावर आपला ठसठशीत ठसा उमटवला. आपले मातामह पं. जवाहरलाल नेहरू यांच्याप्रमाणेच राजीव गांधी हेही विज्ञानवादी सर्व आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करणारे होते. एकविसाव्या शतकात भारतामध्ये घरोघरी कॉम्प्युटर यावा ही त्यांची उत्कट इच्छा होती. परंतु त्यांनी केवळ यावरच भर दिला असे नाही. वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या निमित्ताने त्यांनी जी अनेक भाषणे केली त्यांत विज्ञान तंत्रज्ञान यांच्या जोडीने शिक्षण शाळकरी मुलांवरील संस्कार त्यांचे व्यायाम व खेळ वृद्धांपुढील विविध समस्या कृषिजीवन निसर्ग अशा कितीतरी विषयांवर ते तळमळीने बोलत. त्यांच्या विविध भाषणांतले हे उतारे... राजीव गांधी यांचे प्रगतीपर सर्वसमावेशक समृद्ध आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व प्रकट करणारे...
Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.