माणसाचं शरीर म्हणजे मशिनच नव्हे का? त्यात क्रोधाचे अहंकाराचे विचार जे सर्वप्रथम स्वतःलाच हानी पोहोचवतात. इतिहासात डोकावून पाहिलं तर लक्षात येईल रागाच्या भरात बोललेल्या शब्दांमुळे महायुद्धंही झाली. पण रागात सृजनात्मकतासुद्धा असू शकते हे रहस्य ‘नोकरी ईश्वराची’ या पुस्तकाद्वारे आपण जाणणार आहोत. माणसाचं जीवन म्हणजे एखाद्या नदीसमान आहे. त्याला सीमा असल्याने दुःखालाही किनारा मिळतो. पण या सीमाच जर आपण काढून टाकल्या तर दुःखाची वाफ होऊन क्षणार्धात ते गायब होईल. यासाठी प्रत्येक घटनेचा परिस्थितीचा स्वीकार कसा करायचा याचा मार्गही या पुस्तकात आपल्याला गवसणार आहे. ‘परफेक्ट कम्युनिकेशन’ कसं करायचं हे या पुस्तकातून आपण शिकणार आहोत.
Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
*COD & Shipping Charges may apply on certain items.