*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹499
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
नावीन्यपूर्ण कल्पना व्यक्तींना कशा सुचतात याचा लेखक शोध घेऊन त्याबाबत आडपडदा न ठेवता बोलतो तसंच सर्जनशील मुलांना पालक कसं वाढवतात त्याचं वर्णन करतो. त्याबरोबरच गटविचाराशी लढा देण्यासाठी संस्कृती कशी उभारली जाते ते सांगतो. नावीन्यपूर्ण कल्पनांना कसं प्रोत्साहन दिलं जातं त्यावरही लेखक स्वतःचं मत मांडतो. वैशिष्ट्यपूर्ण अभ्यासानं आणि उद्योग धोरणं खेळ व करमणूक यांच्याबद्दलच्या सुरस कथा सांगून लेखक दाखवून देतो की मौलिक विचारवंत तुमच्या-आमच्यासारखेच असतात. त्यांच्यात कोणतीच नवलाई नसते. ते दिरंगाई करतात. शंका व भीतीनं त्यांनाही घेरलेलं असतं. त्यांच्याकडेही कमी गुणवत्तेच्या कल्पना असतात. मात्र कुठल्याही प्रकारे त्या कल्पनेच्या संदर्भातली कृती करायचीच हा विचार त्यांना ते इतरांपेक्षा वेगळे असल्याचं दाखवतो. आपल्या उत्कृष्ट कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यात आपण कसं यशस्वी होऊ शकतो याबद्दलची मर्मदृष्टी हे पुस्तक प्रदान करतं.