पाली वाङ्मयातील 'जातककठ्ठवण्णना' या ग्रंथाचा समूल अनुवाद दुर्गा भागवत यांनी केला तो 'वरदा बुक्स' ने सात खंडात छापलेला आहे. त्यानंतर पाली वाङ्मयातील या प्रेमकथा दुर्गाबाईंनी एकत्र केल्या. त्याला विस्तृत प्रस्तावना दुर्गाबाईंनी लिहिलेलीच आहे. पाली वाङ्मयात अनेक विषय असून ते सर्वच अजून लोकांसमोर आलेले नाहीत. त्यातलाच हा एक प्रयत्न आहे. या पाली प्रेमकथा अनेक साप्ताहिक मासिकांतून छापून आल्यामुळे लोकप्रिय झाल्याच आहेत. या एकत्रित संग्रहाचे रसिक उत्तम स्वागत करतील अशी मला आशा आहे.