''पंचायतराज'' हे मनोज पाटील लिखित पुस्तक पंचायतराजबाबत समग्र माहिती देते. जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी कार्यकर्ते आणि सामाजिक संस्था यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त माहिती यात दिली आहे. महापालिका नगरपालिका नगरपंचायत कॅन्टोन्मेंट बोर्ड मुलकी आणि पोलिस प्रशासन रचना व अधिकार यांची विस्तृत मांडणी केली आहे. पंचायतराज आणि सुधारणेबाबत नेमलेल्या विविध समित्यांच्या शिफारशी ७३वी घटनादुरुस्ती ७४वी घटनादुरुस्ती याविषयी विवेचन यात आहे. ग्राम विकासाबाबतच्या योजनांची माहिती यामध्ये दिली आहे. स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे मुद्दे पुस्तकामध्ये मांडले आहेत. एमपीएससी व सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त पुस्तक! लेखकाविषयी माहिती : मनोज पाटील यांनी राज्यशास्त्र विषयात बी.ए. केले असून पत्रकारितेची पदविका संपादन केली आहे. त्यांची विविध विषयांवरील ३५ पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. ''७/१२ शेतीचे कायदे शेतजमिनीचे कायदे'' ''पंचायतराज'' (पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश) ''महाराष्ट्रातील राजकीय घराणी'' ''लढवय्या यशवंत नेते घडविणारा महानेता'' ''मराठी मनाचा राजा'' ''लोकनायक गोपीनाथ मुंडे जननायक'' ''माहितीचा अधिकार ग्रामपंचायत मार्गदर्शिका'' ही त्यातील काही पुस्तके असून शालेय व पत्रकारिता अभ्यासक्रमात यातील पुस्तकांचा समावेश झाला आहे. पत्रकार लेखक सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम करताना त्यांनी विविध आंदोलनात भाग घेतला आहे. तसेच अनेक सामाजिक समस्या सोडविल्या आहेत.
Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.