प्रत्येक व्याधीत कोणत्या अवस्थेत कोणते पंचकर्म केले जातात याची मांडणी आम्ही आचार्य चरकानुसार केलेली आहे. पंचकर्म चिकित्सा ही स्वतंत्रपणे किंवा चिकित्सेचा एक भाग म्हणून ही करता येते. प्रत्येक पंचकर्म कृतीचे निर्देश देताना त्या कृतीची पद्धत शास्त्रात सांगितलेली आहे त्यानुसारच ती करावी असे जर केले नाही तर उपाय पेक्षा अपाय होण्याचे भय जास्त राहते. रोगावर उपचार करताना वैद्यामध्ये सुसंगतता असावी आणि विद्यार्थांना अभ्यासाची सोय व्हावी हा आमचा प्रामाणिक उद्देश आहे. येथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ज्या रोगांमध्ये पंचकर्म क्रिया पुढे नमूद केलेल्या आहेत त्या सर्व पंचकर्म क्रिया व्याधीचे पूर्ण उपचार ठरत नाहीत. हे पुस्तक येथे केवळ वैद्यांना चिकित्सा करताना व विद्यार्थ्यांना अभ्यास करताना मार्गदर्शक ठरेल यासाठी उद्धृत केले आहे.