*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
About The Book
Description
Author
पाणिपत हे नाव कानी आले किंवा त्याची आठवण झाली की मनाची चमत्कारिक स्थिती होते. दुःख आणि अभिमान दोन्हीही जागृत होतात. अभिमान अशासाठी की ह्या घनघोर युद्धाच्या प्रसंगी आम्हा मराठ्यांनी शौर्य धारिष्ट दृढनिश्चय राजनिष्ठा इत्यादी जे गुण आपल्या अंगी दाखविले ते मनांत येऊन आम्ह मोठे भूषण वाटते. दुःख अशासाठी की कृतप्रयत्न सर्व व्यर्थ होऊन 'शेवटी आमचा पराजय आणि सर्वस्वनाश झाला' व ह्या युद्धांत जय प्राप्त झाला असता तर त्यापासून जे वैभव आणि सार्वभौमत्व प्राप्त झाले असते त्यास आम्ही अंतरलो. ह्या युद्धाच्या कथा वाचून तर आपली स्थिती याहूनही चमत्कारिक होते. अपजयामुळे व सर्वस्वहानीमुळे कितीही वाईट वाटो ह्या युद्धाचे वृत्त वाचल्यावर कितीही दुःखाचे उसासे येवोत पुन: पुन: ती युद्धकथा आणि ते भारती पराक्रम वाचण्यास आपण उत्सुक होतो. आपले चित्त वेधून जाते.