*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹238
₹299
20% OFF
Paperback
Out Of Stock
All inclusive*
About The Book
Description
Author
‘पंख सकारात्मकतेचे’ हे दैनिक सकाळमध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखमालेचे पुस्तकरूप. लेखक डॉ. ओस्तवाल हे जरी डॉक्टर असले तरी हे लेख म्हणजे निव्वळ आरोग्यावरचे कथन नाही. ते स्वत: या सगळ्या अनुभवांतून गेलेले आहेत. या सर्व प्रसंगात त्यांनी सकारात्मकता कृतीत उतरवली आहे. अत्यंत अवघड प्रसंगांमध्ये परिस्थितीवर फक्त आणि फक्त सकारात्मकतेने कशी यशस्वी मात करता येते याचे वस्तुनिष्ठ अनुभव या पुस्तकात सर्व वाचकांना वाचायला मिळतील. या पुस्तकातील प्रत्येक कथा ओघवत्या शैलीमध्ये लिहिली आहे. या कथा वाचकांसाठी अत्यंत बोधप्रद ठरतील आणि त्यातून त्यांना जीवनभरासाठी सकारात्मकतेची ऊर्जा मिळेल. लेखकाविषयी : डॉ. हेमंत सुशीलाबाई पवनलाल ओस्तवाल हे सुयश हॉस्पिटल मुंबई नाका नाशिक येथे व्यवस्थापकीय संचालक आहेत. त्यांनी १९८५मध्ये वैद्यकीय पदवी संपादन केली आणि १९८६मध्ये नाशिकमध्ये ओपीडीची सुरुवात केली. मोटिवेशनल स्पीकर म्हणून संपूर्ण भारतामध्ये त्यांची ओळख आहे. सकारात्मकतेने कुठलीही परिस्थिती हाताळण्यामध्ये बोलण्यामध्ये त्यांचा हातखंडा आहे.