‘पिंकोना’मधील लेखांचा सर्वंकष विचार केला तर असे लक्षात येते की लेखकाची सहजता संवेदनशीलता चिंतनशीलता अभ्यासूवृत्ती आणि निकोप जीवनदृष्टीचा प्रत्यय या लेखांमधून येत असला तरी या लेखनावर कुठलीही छाप नाही. याचाच अर्थ हे लेखन सर्वस्वी स्वतंत्र आहे. अर्थात मळलेल्या वाटेने जाण्यापेक्षा स्वतःची नवी वाट निर्माण करणे अवघड असले तरी अशक्य नाही याची प्रचितीच लेखकाने या लेखनातून दिलेली आहे. अशा प्रकारचे लेखन सुचण्यामागची भूमिका लेखकाने आपल्या मनोगतामध्ये स्पष्ट केलेली आहे. त्याचाच संदर्भ घेऊन मला असे म्हणावेसे वाटते की ‘स्टेरॉइडच्या औषधाचा’ इतका चांगला परिणाम मीदेखील या ‘पिंकोना’च्या रूपाने प्रथमच अनुभवतो आहे.
Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.