पुस्तकाविषयी माहिती : आयकर सल्लागार व वकील म्हणून पन्नासहून अधिक वर्षे व्यवसाय करताना नावलौकिक प्राप्त करणारे अॅड. श्रीकृष्ण इनामदार यांनी न्याय्य-मूल्ये जपण्याचा कसोशीने केलेला प्रयत्न... कायदेशीर लढाया असल्या तरी त्यातून काही सुरस किस्सेही घडले त्यांचे दर्शन म्हणजे हे पुस्तक! सामाजिक दर्जा काहीही असला तरी त्या व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे हे एक तत्त्व वकील म्हणून लेखकाने कसे सांभाळले त्या सुरस किश्शांचे हे पुस्तक आहे. या आणि यांच्यासारख्या अनेक किश्शांनी आयुष्य कसं जगावं - आयुष्य कसं असावं हे लेखकाला शिकवले... त्यांचीच ही खुमासदार मांडणी. शंतनुराव किर्लोस्कर व नीलकंठ कल्याणी यांची केस नानी पालखीवाला केस ओशो केस गुरू-शिष्य नातेसंबंध दर्शविणारी कथा! यांमधून आपल्याला अनेक ज्ञात-अज्ञात व्यक्ती भेटतात... लेखकाविषयी : अॅड. श्रीकृष्ण इनामदार हे बीकॉम परीक्षेत ते प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले आणि त्यांना राष्ट्रीय शिष्यवृत्तीही मिळाली होती. मुंबई विद्यापीठाच्या कायद्याच्या परीक्षेतही ते पहिले आले व त्यांनी सुवर्णपदक पटकावले. अनेक उद्योगसमूहांचे आयकर सल्लागार म्हणून काम पाहिले. वकील म्हणून व्यवसाय करताना आयकर कोर्टात (ट्रायब्युनल उच्च न्यायालय) केसेस चालवणे व सल्ला देणे हे काम त्यांनी केले आहे. चेंबर ऑफ टॅक्स कन्सल्टंट्स या संस्थेचे ते एक वर्ष अध्यक्ष होते. त्यांनी अनेक मासिकांमधून आयकराशी संबंधित विषयावर लिखाण केले आहे.
Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
*COD & Shipping Charges may apply on certain items.