*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹125
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
अल्प शब्दात कवीची मानसिक आंदोलने टिपण्याची शक्ती कवितेत असते. त्यामुळेच कमी शब्द हे कवितेचे सामर्थ्य ठरते. ‘प्रपात’ हा कवी लेखक प्रणव लेले यांचा दुसरा कवितासंग्रह असून यामध्ये एकूण सत्तर कविता आहेत. साहित्य मग ते कोणत्याही प्रकारातील असो त्यामध्ये लेखकाच्या किंवा कवीच्या भवतालचे एक प्रतिबिंब सतत दिसत राहते. कवी लेले यांची कविताही याला अपवाद नाही. आपल्या आजूबाजूची परिस्थिती विषण्ण करणारी कोणत्याही विचारी माणसाला संभ्रमात टाकणारी आहे. या परिस्थितीतून कवीच्या मनात निर्माण होणारा कल्लोळ मांडणाऱ्या या कविता अशा गुंतागुंतीच्या परिस्थितीवर समयोचित भाष्य करतात. विषण्ण करणाऱ्या अशा परिस्थितीत तग धरून राहण्यासाठी आणि व्यक्त होण्यासाठी अध्यात्माऐवजी आपण कलेचा मार्ग स्वीकारला असे श्री. प्रणव लेले प्रस्तावनेत सांगतात. देशातील वाढती धार्मिक दांभिकता पैशाचे वाढते महत्त्व बुवाबाजी युद्ध या आणि अशा अनेक विषयांवर निरीक्षणातून लिहिलेल्या कविता या संग्रहात आहेत. लेखकाविषयी: कवी लेखक प्रणव लेले हे पुणे येथे वास्तव्यास असतात. ऑर्गॅनिक केमिस्ट्री या विषयात त्यांचे पदव्युत्तर शिक्षण झाले आहे. ते पूर्णवेळ व्यावसायिक असून भटक्या प्राण्यांविषयी त्यांना विशेष जिव्हाळा आहे. हिंदू आणि वैदिक परंपरा हेदेखील त्यांचे अभ्यासविषय आहेत. लेखनाबरोबरच पाककला चित्रकला वाचन भटकंती आणि क्रीडा यात त्यांना विशेष रस आहे.