लेखक श्रीराम भास्करवार यांनी स्वतः अनुभवलेले अनुभव या पुस्तकात सोप्या भाषेत शब्दबद्ध केले आहेत. हे पुस्तक गाव खेडे आणि शहर यामध्ये कुठेतरी वावरते. रोजच्या जगण्यात जे दिसते ते त्यांनी साध्या आणि सोप्या भाषेत मांडले आहे. चार विभागांमध्ये पुस्तकाची मांडणी करण्यात आली आहे. माहितीप्रद सहल धार्मिकस्थल दर्शन आणि प्रवास वर्णन या विभागांअंतर्गत भास्करवार यांनी पुस्तकाची मांडणी केली आहे. भास्करवार यांनी केवळ यात्रा किंवा मज्जा म्हणून प्रवास केला नाही तर प्रत्येक प्रवास त्यांनी डोळसपणे केला त्यातून त्यांनी जे निरीक्षण केले ते त्यांनी या पुस्तकातून मांडण्याचा अगदी प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे. त्यांच्या लेखनशैलीत विनोदही आलेला असल्याने वाचकाला लेखन वाचून माहिती आणि समाधान दोन्ही मिळेल यात शंका नाही. अतिशय मजेदार पद्धतीने त्यांनी त्यांच्या प्रवासातील निरीक्षणे विविध प्रसंग आणि उदाहरणे देऊन मांडली आहेत. लेखकाविषयी : महाराष्ट्र शासनाच्या पाठबंधारे खात्यात श्रीराम भास्करवार यांनी नोकरी केली असून सध्या ते निवृत्त असून वाचन आणि लेखन सातत्याने करतात. निवृत्त होऊन तेरा वर्षांचा काळ लोटला असून सध्या लेखक यवतमाळ येथे राहतात. ‘प्रवासातून प्रबोधन’ हे त्यांचे पहिले पुस्तक असून लवकरच त्यांचे दुसरेही पुस्तक प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहे.
Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.