प्रस्तुत पुस्तक वाचून आपण स्वतःमध्ये अमर्याद प्रेमाची अनुभूती घ्याल. त्यानंतर तुम्हाला प्रेमासाठी कोणापुढे विनवणी करण्याची गरज भासणार नाही. आपल्या जीवनात प्रेमनियमांचं आगमन होताच नात्यात दुरावा येण्यास कारणीभूत असलेल्या नकारात्मक भावनांचं विसर्जन होईल.वास्तविक आपल्या अंतर्यामी प्रेमाचं असीम भांडार असूनही आपण प्रेम मिळवण्यासाठी सतत धडपडत असतो. प्रेमाविषयी आपल्या विशिष्ट धारणा बनल्याने त्यानुसारच प्रेम मिळायला हवं अशी आपली इच्छा असते. त्यामुळे विभिन्न रूपात आपल्याला प्रेम मिळत असूनही आपण ते ओळखू शकत नाही. मला अमुक पद्धतीनंच प्रेम मिळायला हवं… ही अपेक्षाच मनुष्याला खऱ्या प्रेमापासून वंचित ठेवते. या समस्येतून मुक्त होण्यासाठी प्रेमनियमांद्वारे खालील काही गोष्टी प्रस्तुत पुस्तकात आपण जाणणार आहोत.* असे कोणते लोक आहेत ज्यांना तुमचं प्रेम हवंय.* प्रेम कधी नाहीसं होतं* तुमचं प्रेम कुठल्या साचात अडकलंय* प्लास्टिक प्रेमातून (नकली प्रेमातून) मुक्त कसं व्हाल* प्रेमाचं पतन होण्यामागे कोणती तीन महत्त्वपूर्ण कारणं आहेत* इतरांची पर्वा कधी का आणि कशी करावी* प्रेमात मोह वासना आणि ईर्षेची आवश्यकता आहे का* द्वेषातून मुक्त कसं व्हाल* क्षमेच्या शक्तीचा उपयोग कसा कराल* “ईश्वरीय प्रेम’ आणि “प्रेम समाधी’नं काय साध्य कराल
Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.