लेखकाचे मनोगत प्रेमरंग हा नवा कोरा कथासंग्रह हा तुमच्या हाती सोपवितांना मला अतिशय आनंद होतं आहे.आज पावेतो वेगवेगळ्या कथा मी लिहिल्या पण नवरंगी नऊ वेगवेगळ्या प्रेमकथा मी यांत गुंफल्या. जरी सगळ्याच कथांचे सूत्र प्रेम हे असलं तरी या प्रेमकथा एक सारख्या त नाहीत.दोन प्रेमिकांच्या व्यक्त करण्याच्या पद्धती वेगळ्या प्रेमात पडणं वेगळं आहे. प्रेमिकांच्या तऱ्हा वेगळ्या आहेत. प्रेम हे एक सूत्र असलं तरी मनं वेगळी असतात.फूल या सर्वनामात किती वेगवेगळी फूल असतात. गुलाब जयजुईचमेली जास्वंदी मोगरा कन्हेरी रातराणी कमळ यांचा रंग वेगळा आणि फुलोरा देखिल वेगळा. तसचं प्रेम हे सर्वनाम आहे आणि या प्रत्येक कथा वेगळ्या आहेत प्रेमाचा फुलोरा वेगळा आहे त्याचे रंग वेगळे आणि गुणधर्म वेगळे आहेत. या सगळ्याचा अनुभव तुम्हाला हा कथासंग्रह वाचतांना येईलच. माझ्या इतर पुस्तकांप्रमाणे माझ्या ह्या प्रेमरंगला तुमचं प्रेम लाभेल अशी आशा आहे.
Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.