*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹1204
₹1500
19% OFF
Hardback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
संस्कृत-प्राकृतपासून चालत आलेल्या काव्यपरंपरेशी जरी पु. शि. रेग्यांनी आपल्या कवितेचे नाते जोडले असले तरी कवितारूपासंबंधीचा जो आधुनिक विचार आहे तोही रेग्यांनी आपला बनवला. किंबहुना आपल्या काव्यनिर्मितिद्वारे मराठी कवितेत तो त्यांनी रुजवला. कविता ही फक्त कविताच असली पाहिजे कवितेचा आकृतिबंध आणि कवितेची भाषा अन्य वाङ्मयरूपांपेक्षा आणि भाषारूपांपेक्षा भिन्न आहे; वाङ्मयक्षेत्रात तिला स्वतःचे कार्य असल्यामुळे अन्य भाषारूपांकडे स्वाभाविकपणे असलेली कामे तिने आपल्या शिरावर घेऊ नयेत हे पथ्य त्यांनी आपल्या निर्मितीत कटाक्षाने पाळले. आपल्या कवितेला त्यांनी मिळवून दिलेले विशुद्ध रूप त्यांनी शेवटपर्यंत सांभाळले. म्हणून नवकविता घडवण्याच्या श्रेयाचे ते मर्ढेकरांच्या बरोबरीचे मानकरी ठरतात. – सुधीर रसाळ (प्रस्तावनेतून)