लेखिकेने या पुस्तकातून राहुल बजाज आणि त्यांचे विविध घडामोडींनी भरलेले खळबळयुक्त जीवन यांचे कसलाही आडपडदा न ठेवता चित्रण केले आहे. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात राहुल बजाज यांच्या आई तुरुंगात गेल्या होत्या त्या प्रसंगापासून कहाणी सुरू होते आणि नव्या आशा मनाशी बाळगणाऱ्या एका स्वतंत्र देशातील प्रारंभीचे जीवन कसे होते त्याची झलकच आपल्याला मिळू लागते. नवनव्या ‘स्टार्ट अप्स'च्या युगात ‘हमारा बजाज'च्या मागे ठामपणे उभ्या राहणाऱ्या माणसाच्या शाश्वत वारशाचे चित्रण गीता पिरामल यांनी अत्यंत कौशल्याने केले आहे. अत्यंत बारकाईचे निरीक्षण आणि सखोल अंतर्दृष्टी यांच्या जोडीला या चरित्रात कुटुंब व्यवसाय आणि सार्वजनिक जीवन यांविषयीचे आणि समाजवस्त्रावर कधीही पुसला न जाणारा असा आपला छाप अंतिमतः कसा सोडून जावा याविषयीचे अतुलनीय धडेही चटकदार शैलीत दिले आहेत.
Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.