भारतात कौटिल्य किंवा चाणक्य यांच्या 'अर्थशास्त्र' ह्या ग्रंथाला जे महत्त्व आहे तसेच महत्त्व मॅकिव्हिलीच्या 'प्रिन्स' (राजा) ह्या ग्रंथाला आहे मॅकिव्हिली हा इटलीमधील फ्लॉरेंस या नगरराज्यात सेक्रेटरी म्हणजे मंत्री होता त्याचा जन्म 3 मे 1469 मध्ये झाला आणि तो सन 1527 च्या जूनला निधन पावला. म्हणजेच चाणक्याचा काळ व मॅकिव्हिलीचा काळ यामध्ये 16 शतकांचे अंतर आहे. तरीही हे दोघे मध्ययुगीन सरंजामशाही व राजेशाही राज्यसंस्थेचे पुरस्कर्ते होते. आपले राज्य सांभाळण्यासाठी व स्वतःचा उत्कर्ष साथण्यासाठी मॅकिव्हिली सत्य अहिंसा सदाचार अशा उत्तम गुणांचा पुरस्कार करीत नाही. प्रजेच्या हितरक्षणाची त्याला मुळीच जाणीव नाही. म्हणून चाणक्य आदर्श राज्याच्या पुरस्काराबाबत श्रेष्ठ ठरतो. कारण चाणक्याने प्रजेच्या हिताला प्राधान्य दिले आहे. मॅकिव्हिलीचा काळ हा युरोपातील पुनरुत्थानयुगाची सुरुवात होती. ही सुरुवात 1453 मध्ये झाली असे मानतात. त्या काळात युरोपात व सर्व जगात मध्ययुग म्हणजे 'अंधारयुग' होते. व विज्ञानयुगाची सुरुवात नुकतीच झाली होती. पुनरुत्थानयुगाचे पहिले अग्रदुत इटली देशातीलच होते. डांटे बोकॅशिओ अशा लेखकांनी प्रथम पुनरुत्थानाच्या नव्या युगाची तुतारी इटलीमध्येच फुंकली होती. पण या तुतारीचा आवाज मॅकिव्हिलीने ऐकलेला दिसत नाही. राजसत्ताकेंद्रित व्यक्तिगत स्वार्थाची राज्यव्यवस्था याचा पुरस्कार मॅकिव्हिली करताना आढळतो. त्यामुळे युरोपातील राजांना व आधुनिक युगातील हिटलरसारख्या हुकुमशहांना डांटेची एकछत्री सत्ता असलेली केंद्रिय राज्यपध्दती आवडत होती. मॅकिव्हिली राहत होता त्या नगरराज्यात लोकशाहीची थोडीफार प्रसादचिन्हे दिसत .होती. पण मॅकिव्हिलीने त्या लोकशाहीला फारसे महत्त्व दिलेले आढळत नाहीयुरोपातील राज्यशास्त्रात मॅकिव्हिलीच्या 'प्रिन्स' या ग्रंथाला फार महत्त्व आहे. लोकशाहीचा व विज्ञानयुगाचा पूर्ण उदय होईपर्यंत युरोपातील राज्यशासन मॅकिव्हिलीच्याच तत्त्वानुसार चालू राहिले होते. मॅकिव्हिलीचा विशेष असा आहे की अनेक छोट्या राज्यात विभागलेल्या इटलीमध्ये सर्व देशाच्या एका साम्राज्यसत्तेची कल्पना फार पूर्वी केली होती. ती कल्पना त्याच्यानंतर 500 वर्षांनी इटलीत प्रत्यक्षात आली. उदात्त राज्यव्यवस्थेच्या बाबतीत चाणक्यानेच लिहिलेली तत्त्वे मॅकिव्हिलीपेक्षा श्रेष्ठ ठरतात. पण खरे म्हणजे प्रिन्स कौटिल्य - अर्थशास्त्र या दोन्ही ग्रंथांचा तुलनात्मक अभ्यास होण्याची गरज आहे.
Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.