*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹150
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
श्रीराम हे समर्थ रामदास स्वामींचे परम दैवत होते. म्हणूनच पंढरपूर येथे उभ्या असलेल्या विठ्ठल मूर्तीमध्येही रामदासांना रामाचे दर्शन झाले. याबाबत त्यांनी लिहिलेल्या निवडक अभंगांचे भावगर्भ निरूपण या पुस्तकात लेखिकेने केले आहे. समर्थ रामदासांनी लिहिलेल्या ‘पावनपंचक’ या वैशिष्ट्यपूर्ण पदांचे निरूपणही येथे वाचावयास मिळेल. श्रीराम आणि श्रीविठ्ठल यांच्या एकरूपतेतून भक्ती आणि शक्तीचा संगम समस्त संतांनी कसा साधला होता याचे समर्थपणे दर्शन घडविणारे तत्त्वचिंतनपर पुस्तक ‘राम तोचि विठ्ठल’. लेखिकेविषयी : शीला देशमुख या लातूरमधील जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातून वर्ग-२ मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाल्या असून त्यांना संतसाहित्याची आवड आहे. त्यांचे ‘ रामपाठ निरूपण पुष्पे’ हे पुस्तक प्रकाशित आहे.