*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
About The Book
Description
Author
छत्रपती राजाराममहाराज संभाजीमहाराज भोसले यांचे 'मार्च १७००' साली देहावसान झाल्यावर... पर्वताएवढे दुःख नजरेसमोर उभे असताना ते अवघे दुःख एका क्षणात मनोवेगाने ओलांडून ताराबाईराजे यांनी 'केवळ स्वराज्यासाठी'च शर्थीने राज्य राखण्याचा दृढनिश्चय केला अन् रामचंद्रपंतांसमोर जणू... हाती शस्त्र घेण्याचीच... प्रतिज्ञा केली आणि एके दिवशी आपल्या 'लक्ष्मी' नावाच्या घोडीवर बसण्याचा सरावही पुन्हा सुरू केला.पूर्वीच दूरदृष्टी राखून... त्या लहानपणी युद्धतंत्र शिकल्या होत्याच. त्याचा त्यांना पतिराजांच्या मृत्यूनंतर बादशहाच्या हल्ल्यांना तोंड देण्यासाठी मोठाच फायदा झाला... तो थोड्याथोडक्या काळासाठी नाही तर इ.स. १७०० ते १७०७ पर्यंत औरंगजेबाचा मृत्यू होईपर्यंत... अनेक माणसांचा 'उभा जन्म' हा 'निरनिराळी' लढाई करण्यातच निघून जातो. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर ताराबाईनी 'मराठी कुरुक्षेत्रावर' आणि कौटुंबिक नैतिक लढाई खेळली ती पुत्राच्या छत्रपती पदासाठी... परन्तू औरंगजेब बादशहाला तोंड देताना तीन महिन्याच्याच काळात परळी पुरंदर सातारा आणि पन्हाळा येथील किल्ले घेतले. एका स्त्रीने हे काम करणे हे आजच्या स्त्रीला अभिमानाची गोष्ट आहे असे हे नयनताराबाईनी कादंबरीरूप 'ताराबाई चरित्र' प्रत्येक शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी अन् विद्यार्थीनीनींही वाचावे असे लिहिले आहे.