एका लहानशा खेड्यापासून UNO सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थेपर्यंत विचार आणि कार्य विश्वाचा आवाका असणारे ज्येष्ठ विचारवंत डॉ. जनार्दन वाघमारे यांचे भारत या राष्ट्राच्या प्रगतीसाठी कळकळीने केलेले मौलिक मार्गदर्शन. सगळ्या विविधता भेदाभेद यांच्यापलीकडे जाऊन एकमय भारतीय होण्यासाठी राज्यघटनेने दिलेली मार्गदर्शक तत्त्वे अनुसरणे अपरिहार्य आहे. या अनुशासनातूनच भारत एकसंघ बलशाली राष्ट्र बनू शकेल हा विचार प्रभावीपणे मांडणारे चिंतनपर पुस्तक. आपण खरोखर एक राष्ट्र आहोत का? कसे बनते एक राष्ट्र? राष्ट्र म्हणजे नेमके काय? स्वातंत्र्य चळवळीत निर्माण झालेली राष्ट्रवादाची भावना राष्ट्रनिर्मितीची प्रक्रिया पूर्ण करू शकलो नाही का? विविध धर्म-वंश-जाती-भाषा-संस्कृती असणारा हा खंडप्राय भूभाग खरंच एक राष्ट्र बनू शकेल का? या प्रश्नांची उत्तरं या पुस्तकात मिळतील. विद्यार्थ्यांसाठी राजकीय नेत्यांसाठी कार्यकर्त्यांसाठी... प्रत्येक सजग भारतीय नागरिकासाठी संग्राह्य वाचनीय पुस्तक राष्ट्राच्या शोधात भारत. लेखकाविषयी : डॉ. जनार्दन वाघमारे हे विचारवंत शिक्षणतज्ज्ञ आणि साहित्य समीक्षक म्हणून उभ्या महाराष्ट्राला परिचित आहेत. प्राध्यापक प्राचार्य कुलगुरू या भूमिकांतून त्यांनी भारतीय शिक्षणपद्धतीवर मूलभूत चिंतन व लेखन केले आहे. सगळ्या महाराष्ट्रात गाजलेल्या लातूर पॅटर्नची निर्मिती त्यांच्याच नेतृत्वाखाली झाली. नांदेड येथील ‘स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठा’चे से. संस्थापक कुलगुरू होते. डॉ. वाघमारे हे सिद्धहस्त लेखक आहेत. विविध विषयांवर त्यांनी विपुल लेखन केले आहे. आतापर्यंत त्यांची ६७ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. विविध साहित्य संमेलनांचे त्यांनी अध्यक्षपदही भूषविले आहे.
Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
*COD & Shipping Charges may apply on certain items.