रयतेचा राजा शिवछत्रपती या ऐतिहासिक पुस्तकात शिवाजीराजे व शिवकालीन स्फूर्तीदायक ऐतिहासिक घटनांचे सादरीकरण केलेले आहे; परंतु याशिवाय काही ठळक घटना व रोमहर्षक प्रसंग यांना प्रकाशात आणणेसुद्धा लेखकाचा मुख्य उद्देश्य आहे. प्रस्तुत विवेचनात शिवजन्म पूर्व दोन दशकात महाराष्ट्रातील गोर-गरीब लोक विविध शाह्याच्या गुलामगिरीच्या जोखडात पिचून गेले होते. याचेही वास्तववादी चित्रण केलेले आहे. तसेच शिवरायांचे पिता शहाजीराजे यांनाही स्वतःचे अस्तित्व टिकविण्यासाठी अनेक वेळा सत्तांतर करावे लागले त्याचाही आढावा घेतलेला आहे. शिवाजी महाराजांचे बालपण शिक्षण व व्यक्तिगत विकास याकडेही जाणीवपूर्वक दृष्टिक्षेप टाकलेला आहे. महाराजांना स्वराज्यासाठी आदिलशाही मुघलशाही व परकीय सत्ता यांच्याशी संघर्ष करावा लागला. त्यातूनच स्वराज्याचा पाया घातला व स्वराज्याची निर्मिती केली. यासाठी विविध गड किल्ले व भूप्रदेश युद्ध मोहिमांद्वारे आपल्या ताब्यात घेतले आणि सन 1656 ला आरमार स्थापन केले. या कामी स्वराज्याच्या विविध शिलेदारांचे त्यांना पाठबळ मिळाले. त्यांच्या शौर्यातून धैर्यातून व बलिदानातून शिवरायांच्या स्वप्नातले स्वराज्य उभे राहिले. यातून सर्वसामान्य रयतेला शिवरायांनी न्याय मिळवून दिला व कोणत्याही प्रकारचा जात धर्म पंथ स्त्री पुरुष गरीब श्रीमंत असा भेदभाव न करता सर्वांच्यासाठी स्वराज्य निर्माण केले. स्वराज्याचे स्वप्न साकार करण्यासाठी महाराजांच्या अंगी असलेल्या विविध सद्गुणांचा व ध्येय धोरणांचा उपयोग झाला असून त्यातून शिवरायांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे वाचकांना दर्शन घडेल अशी अपेक्षा आहे.
Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.