Rikta is Mohana Prabhudesai Joglekars second story collection. Each story from this collection shows different shades and variations in human nature. Because of the authors residence in both the United States and India her kaleidoscope of stories include peculiar subjects. Mohanas unique style keeps readers involved and builds curiosity to read further. Her style to show each characters microscopic reactions and thinking is amazing and gives justice to all of the characters in the story.‘रिक्त’ या कथासंग्रहात वेगवगळ्या कारणांमुळे भावनांच्या आवर्तात सापडलेल्या व्यक्तिरेखांच्या मनाचं सूक्ष्म दर्शन घडविणाऱ्या कथा आहेत. परिस्थितीशरण कोणता ना कोणता सल मनात बाळगत जगणारी किंवा एखाद्या घटनेने जीवनात उलथापालथ झालेली अनेक माणसं ‘रिक्त’ या कथासंग्रहातून भेटतात. मग समलिंगी आकर्षणातून मुलीने एखाद्या मुलीशी लग्न करण्याच्या निर्णयामुळे अस्वस्थ झालेली ‘जोडीदार’ कथेतील डॉ. मीरा असेल किंवा एका तरुण मुलाच्या अपघाती मृत्यूला कारणीभूत ठरलेला ‘वाट’ कथेतील शिंदे ड्रायव्हर असेल नवऱ्याच्या संशयीपणाचं भूत मानगुटीवर असहायतेने वागवणारी ‘अस्तित्व’ कथेतील उज्ज्वला असेल किंवा सावत्रआईमुळे वडिलांच्या प्रेमाला पारखी झालेली ‘समाधान’ कथेतील कमू असेल. या कथा मनोविश्लेषणात्मक असल्या तरी त्या वाचकाची उत्कंठा वाढवत राहतात. व्यक्तिरेखांचं मनोविश्लेषण आणि ओघवती लालित्यपूर्ण भाषा या बलस्थानांसाठी वाचकांनी हा कथासंग्रह मुळातून वाचावा असा आहे. वाचनीय आहे|
Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.