सं. भक्त मार्कंडेय हे एक पौराणिक नाटक आहे. जे शिवभक्त मार्कंडेय ऋषीच्या जिवनावर आधारीत आहे. ऋषी मृकंदू आणि त्यांची पत्नी मरुदमती हिला संतान नव्हते.त्यामूळे तिला सर्व बायका वांझ म्हणून हिणवायच्या. एक दिवस त्यांनी देवी पार्वतीची आराधना करुन पुत्रप्राप्तीचे वरदान घेतले.पण ते वरदान विधीलिखित नव्हते. तेव्हा भगवान शंकरानी ऋषी मृकंदूला दोन पर्याय दिले.शतायुषी मतिमंद पुत्र किंवा अल्पायुषी पण अति बुद्धीमान पुत्र. तेव्हा मृकंदूनी अल्पायुषी पण बुद्धीमान पुत्राची निवड केली.आणि मरुदमतीला पुत्रप्राप्ती झाली. आणि जेव्हा बाळ मार्कंडेय दहा वर्षांचा झाला तेव्हा यमदूत त्याला यमसदनी न्यायला आले तेव्हा काय घडले? बाळ मार्कंडेय कसा मृत्यूवर विजय प्राप्त करु शकला? याची उत्तरे प्रस्तूत नाटकात आहेत.