*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹155
₹160
3% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
पुष्पा तारे यांच्या ‘साद’ या लेखसंग्रहात ललित आणि ललितेतर अशा दोन्ही प्रकारच्या लेखांचा समावेश आहे. परदेशात केलेल्या प्रवासाचे वर्णन यात असून नाती भेटलेल्या अनेक व्यक्ती सण-समारंभ सिनेमा पर्यावरण जाहिराती स्त्री शक्ती अशा विविध विषयांची मांडणी त्यांच्या पुस्तकातून केली आहे. सोप्या आणि सहज भाषेत त्यांनी हे लेखन केले आहे. लेखांची नादमय शीर्षके लक्षवेधी आहेत. एकूण २२ लेखांचा हा संग्रह आहे. आयुष्यात भेटून गेलेल्या व्यक्ती अनुभवलेला प्रवास जगण्यात आलेले अनुभव त्यांनी टिपले आहेत. लेखिकेविषयी : लेखिका पुष्पा तारे यांची मातृभाषा कानडी असूनही त्यांनी मराठीतून हे पुस्तक लिहिले आहे. त्यांनी मराठी आणि इंग्रजी नाटकातून अभिनयही केला आहे. ‘पीस कोअर’ या अमेरिकेतील संस्थेत त्यांनी अमेरिकन तरुणांना मराठी शिकवले. वाराणसी येथील सेंट जॉन्स हायस्कूल या शाळेत २६ वर्षे शिक्षिका म्हणून काम केले.वाचन आणि लेखनाची विशेष आवड असून त्यांचे लेखन विविध मासिकात वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेले आहे.