*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹265
₹375
29% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
स्वतःचा विशिष्ट वर्ल्ड व्ह्यू असलेला हा संपादक आहे. असे संपादक आज अगदी क्वचितच आढळतील. राजकीय मतांच्या बाबतीत सदा डुम्बरे लेफ्ट ऑङ्ग द सेंटर म्हणता येईल असे वाटतात; पण त्यांचा खरा पिंड लिबरल विचारवंताचा आहे असे मला तरी वाटते. त्यांच्या आस्थाविषयांचा आवाका स्तिमित करणारा आहे. त्यांच्या बहुमितीय प्रज्ञेचा तो आविष्कार आहे. त्यांचे इंग्रजी वाचन मराठी वाचनाइतकेच विस्तृत आहे. हा संपादक केवळ केबिनमध्ये बसून लेखन करणारा कधीच नव्हता. ह्या पुस्तकातील अनेक लेख त्यांच्या व्यापक अनुभवविश्]वाचा प्रत्यय देणारे आहेत. जागतिक आवाका असलेल्या एका प्रगल्भ संपादकाने केलेले हे लेखन सामाजिक प्रश्]नांविषयीची आपली जाण अधिक समृद्ध करणारे आहे. सदा सर्वदामधील बहुतेक सर्व लेख वाचनीय आणि तरी आजही समयोचित. ते वाचून वाचकाचे विविध सामाजिक प्रश्]नांबाबतचे आकलन अधिक सखोल होते; वेगळ्या दिशांनी विचार करायला तो प्रवृत्त होतो. वाचकांचा उत्तम प्रतिसाद या पुस्तकाला मिळेल अशी आशा व्यक्त करतो. (प्रस्तावनेतून) - भानू काळे संपादक अंतर्नाद