तरुण अभियंता या कथेचा नायक आहे. सौराष्ट्रातील समुद्र किनाNयावर विरळ वस्ती असलेल्या प्रदेशात उजाड जमिनीवर विषारी रसायन तयार करण्याचा सरकारी कारखाना सुरू करायचा असतो. त्यासाठी तेथील जमिनीची मोजणी करून कारखाना सुरू करण्याच्या दृष्टीने अहवाल तयार करण्याचे काम कथानायकावर सोपविले जाते. कथानायक दोन वर्षांपासून बेकार असतो. बेकारीच्या झळांनी तो होरपळलेला असतो. त्यामुळे नाईलाजाने आपल्या मनाविरुद्ध तो अशा निर्जन दुर्गम भागात नोकरीसाठी जाण्याचा निर्णय घेतो. समुद्र किनाNयावरील अशा दुर्गम प्रदेशातही असंख्य अडीअडचणींवर मात करून सुखाने आणि मानाने जगणारी तेथील माणसं कथानायकाच्या मनावर प्रभाव टाकतात. तेथील निसर्ग त्या माणसांतील जिव्हाळा त्या प्रदेशाची विशिष्ट संस्कृती यांचा जवळून परिचय कथानायकाला होतो. त्यामुळे कथानायक नकळत बदलू लागतो. तेथील माणसांविषयी निसर्गाविषयी त्यांच्या संस्कृतीविषयी त्याला आत्मीयता वाटू लागते. धकाधकीच्या आणि अविश्वासावर आधारलेल्या शहरी जीवनाशी तो तेथील शांत प्रेमळ आणि परोपकारी जीवनाची तुलना करू लागतो. या प्रदेशात होऊ घातलेल्या विषारी रसायन तयार करणाNया कारखान्यामुळे येथील सुंदर निसर्ग उद्ध्वस्त होईल. पारंपरिक जीवनमूल्ये मानवी मूल्ये जोपासणाNया येथील माणसांच्या आचार-विचारात बदल होईल. त्यामुळे आपण स्वीकारलेले अहवाल तयार करण्याचे काम सोडून द्यावे की सुरू ठेवावे अशा द्विधा मन:स्थितीत तो वावरत असतो. त्या प्रदेशात हळवी कणखर प्रेमळ धीरोदात्त अशा विविध स्वभावांची माणसं कथानायकाला भेटतात. त्यांच्या साध्या राहणीने सामूहिक जीवनपद्धतीने सडेतोड विचाराने कथानायकाच्या मनावर खोलवर परिणाम होतो. तो त्यांच्या जीवनपद्धतीमध्ये एकात्म होऊन जातो. तेथील माणसांच्या अंत:करणातून येणारा आदरभाव सर्वांना सामावून घेण्याची वृत्ती निसर्गाशी तादाम्य पावण्याची शक्ती याबाबत तो सतत चिंतन करीत असतो. शेवटी जड अंत:करणाने तो त्या प्रदेशात सुरू करावयाच्या कारखान्यांसंबंधीचा अहवाल पूर्ण करतो. एवूâणच जागतिकीकरण आणि ग्रामजीवन यांच्यातील द्वंद्व कथानायकाच्या माध्यमातून साकारणारी ही लघु कादंबरी त्यातील व्यक्तिरेखांसाठी ग्रामजीवनासाठी आणि समुद्राच्या केलेल्या प्रतिकात्मक वापरासाठी अवश्य वाचली पाहिजे.
Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.