*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹319
₹500
36% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
सकारात्मक मानसशास्त्र ही नव्याने उदयास आलेली शाखा आहे. मार्टिन सेलिग्मन हा या शास्त्राचा जनक समजला जातो. ‘लोकांचे सामर्थ्य प्रगट करण्याचा आणि त्यांच्या सकारात्मक कार्यात्मकतेला वाढविण्याचा वैज्ञानिक आणि उपयोजित दृष्टिकोन म्हणजे ‘सकारात्मक मानसशास्त्र’ होय.’ सकारात्मक मानसशास्त्र हे सुख आणि मानवी सामर्थ्याचे शास्त्र आहे. सुखाचे अनेक घटक आहेत. गुणविशेष सद्गुण भाव-भावना आशावाद खुशाली कणखरपणा अस्मिता आत्मसुख ध्येय काम सावधपणा भानावस्था तृप्ती समाधान आस्वाद इत्यादी बाबी जीवनात वृद्धिंगत (भरभराट) करण्याची ताकद या सकारात्मक मानसशास्त्रात आहे. ‘आजारपण (Illness)’ विरुद्ध ‘खुशाली (Wellness)’ या साठीचा प्रयत्न सकारात्मक मानसशास्त्रात दिसतो. आर्थिक आणि सामाजिक निर्देशकांमधून आपल्या खुशालीचे मूल्यमापन होत असते. हा निर्देशक सुखाच्या विरुद्ध दिशेने वाढतच असलेला आढळतो. जवळ-जवळ २०% अमेरिकन लोक हे वैफल्यग्रस्त म्हणून ओळखले जातात. भारतामध्ये मात्र सुखाचे हे प्रमाण ४१% इतके आहे. अशा प्रकारे अनेक असंतुलित क्षेत्रांची गुंफण करण्याचे काम सकारात्मक मानसशास्त्रात चालू आहे. चांगले जीवन आणि चांगला समाज या लोकांच्या संकल्पनेत सुख हा एक अत्यंत महत्त्वाचा मध्यवर्ती घटक आहे. सुख बाहेर नसते तर ते व्यक्तीच्या अंतर्मनात असते. सुख हे प्रत्येकाच्या विचार करावयाच्या पद्धतीवर अवलंबून असते. विलासी ‘सुख’ हे इंद्रियजन्य सुख समजले जाते. आत्मसुख हे आपल्या सुप्त सामर्थ्यातून निर्माण होत असते. सुख हे आत्म-वास्तविकीकरणाच्या पराकाष्ठेतून निष्पन्न होत असते सुख व्यक्तिनिष्ठ असते. ‘सुख म्हणजे जीवन समाधान आणि सकारात्मक-नकारात्मक भावनेचा समतोल होय.’ अर्थात उपरोक्त अनुषंगाने प्रस्तुत पुस्तकात सुखाचा अर्थ आणि त्याची मोजमापे सकारात्मक भावना आणि खुशाली स्थितिस्थापकत्व (कणखरपणा) सुख आणि जीवनाची वस्तुस्थिती व्यक्तिगत ध्येये सकारात्मक गुणविशेष सद्गुण आणि शून्यापलीकडचे जग म्हणजेच ‘अर्थपूर्ण जीवनाचा अर्थ’ इत्यादी बाबींचा अभ्यास केला आहे.