पक्षीय चळवळी आणि सामाजिक आंदोलने यांच्यात जसजशी फारकत होत गेली तसतशी एकप्रश्नलक्ष्यी चळवळ वाढत गेली. बिगर शासकीय संघटनांनीही मोठा अवकाश व्यापला आहे. शिवाय समाजातील विविध समूहांमध्ये जसे आत्मभान व जागृती वाढली तसे त्या समूहांची आत्माविष्काराची व आपापल्या हितसंबंधांचे संवर्धन करण्याच्या गरजेतूनही चळवळी एकप्रश्नलक्ष्यी बनल्या; मात्र एकप्रश्नलक्ष्यी चळवळींनी आपापल्या क्षेत्रात कार्य करत असतानाच समग्रलक्ष्यी परिवर्तनवादी चळवळींशी जैवसंबंध राखले पाहिजेत. सुट्या सुट्या प्रश्नांवरची आंदोलने महत्त्वाच्या टप्प्यांवर एकेकटी पडतात.राज्यसंस्थेच्या माघारीतून सामाजिक चळवळींना उपलब्ध झालेला अवकाश हा जमातवादी धर्मांध मूलतत्त्ववादी शक्तींच्या हाती न जाण्यासाठी कोणत्या प्रकारची उपक्रमशीलता (इनिशिएटिव्ह) दाखवली पाहिजे याचा परिवर्तनवाद्यांनी विचार केला तरच प्रत्येक सामाजिक चळवळीला विधायक प्रतिसाद देणे शक्य होईल.- प्रा. यशवंत सुमंत
Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.