सुमारे अडीचहजार वर्षांपूर्वी या भारतभूमीवर आपले अधिपत्य निर्माण करणारा इतिहासात अतिउच्च स्थान असलेला असा 'सम्राट अशोक' नावाचा राजा होऊन गेला. त्याने केवळ सर्व भारतखंडावर राज्य केले नाही तर येथील जनतेला धर्मज्ञान सदाचार व भूतदया याची शिकवण दिली प्रजेने त्याप्रमाणे वागावे अशी अपेक्षा धरून तसा प्रयत्न आयुष्यभर केला.अशा महान् प्रियदर्शी राजाच्या चरित्रासंबंधी फारसे संदर्भ उपलब्ध होत नाहीत. शंभर वर्षापूर्वी तसे प्रयत्न झाले. काळाच्या ओघात संशोधनात अनेक संदर्भ मिळत गेले व ते आजही मिळत आहेत. कदाचित यापुढेही मिळतील व संशोधनास नवीन विषय मिळत राहील यात शंका नाही. तसेच लेखनही चालू राहील.'सम्राट अशोकाचे' चरित्र त्याने लिहिलेल्या स्तंभ लेखाद्वारेच मिळते. श्री. वा. गो. आपटे यांनी मराठीतून चरित्र लिहून ७५ वर्षे लोटली. त्यानंतर असे मराठीत चरित्र प्रकाशित झाले नाही. मधल्या काळातील झालेल्या संशोधनाचा आधार घेऊन श्री. प्र. रा. अहिरराव यांनी हे चरित्र परिपूर्ण (विकसित) केले आहे. अनेक नवीन संदर्भ विचार व विषय घेतले आहेत ते उपलब्ध झालेली छायाचित्रे व अशोकाच्या शिल्पांचे परिश्रमपूर्वक संपादन करून या चरित्रात दिले आहेत. अशा रितीने सुमारे शंभर वर्षापूर्वीचे चरित्र आजपर्यंतच्या संदर्भासह त्यांनी उपलब्ध करून दिले आहे. या महान् सम्राटाचे पुनर्मरण करण्यास हातभार लावला आहे. मराठी वाङमयातील एक उणीव या ग्रंथरूपाने भरून काढली आहे.
Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.