*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹202
₹234
13% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
समृध्द गाव आणि मनरेगा हा विषय घेऊन गेल्या 2 वर्षा पासून अध्ययन आणि प्रात्यक्षिक कार्य सुरु होते आणि त्यातूनच ही गोष्ट समोर आली कि हा विषय लोकांना देखील कळावा त्यासाठी पुस्तक लिखाणाला मी सुरवात केलीसमृद्ध गाव आणि मनरेगा हे दोन वेगळे विषय जरी असतील तरी ते एकमेकांना सहाय्यक ठरू शकतात व ग्रामीण विकासाला चालना देऊ शकतात. अनेक वेळा समृद्ध गाव कार्यक्रम केवळ पैसा उपलब्ध नसल्याने स्थगित होत असतो मात्र यावर रामबाण उपाय म्हणजे केंद्र शासनाची रोजगार हमी योजना (मनरेगा) या योजनेला निधीची मर्यादा नाही फक्त गावातील लोकांची गावासाठी निस्वार्थ कष्ट करण्याची तयारी असली पाहिजे. फक्त वैयक्तिक लाभ मिळावा या हेतुने जर आपण काम करत असू तर ही योजना अयशस्वी होईल.समृध्द गावातील जलसंधारण कामे सार्वजनीक विकासाची कामे आपण मनरेगा च्या माध्यमातून करू शकतो त्यासाठी आवश्यक सर्व महत्वाच्या बाबी या पुस्तकात सांगितल्या आहे. मला खात्री आहे कि या पुस्तकाच्या माध्यमातून अनेक गैरसमज दूर होतील व ग्रामीण विकासातील कोणत्या बाबी महत्वाच्या आहे त्या कडे सर्वांचे लक्ष जाईल.विकास प्रक्रिया ही निरंतर होत असते त्या साठी शाश्वत मानसिकता लोकांनी जोपासली पाहिजे. कुठलेही कार्य करण्या अगोदर त्या कार्या बद्दल आवड निर्माण होणे फार गरजेचे आहे व पूर्व तयारी शाश्रशुद्ध अध्यनकामात निरंतरता देखील आवश्यक आहे.पहिल्या प्रयत्नात सर्व मिळावे ही अपेक्षा करणे चुकीचे आहे हळू हळू सर्वाना विश्वासात घेऊन टप्प्या टप्प्याने विकास करणे काळाची गरज आहे. ‘’एक गाव तेव्हाच समृद्ध होऊ शकते जेव्हा तिथे समविचारी व सकारात्मक लोकांची संख्या जास्त असेल’’ आपलाच शैलेंद्र मानतकर