Sandhi Tumchya Payashi Aahe
Marathi


Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.

LOOKING TO PLACE A BULK ORDER?CLICK HERE

About The Book

समाजासाठी आणि संस्कृतीसाठी थोर पुरुष नेहमी नवे पायंडे पाडतात. सर्वसामान्य माणूस रुढी पाळणारा व एकमार्गी असतो. स्वत:च्या कुटुंबाच्या किंवा समाजाच्या परिस्थितीत थोडाही बदल करायला तो तयार नसतो. संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे. त्यात म्हटले आहे-"ही माझ्या बापाची विहीर आहे, म्हणून मी त्यातले खारट पाणीच पिणार." म्हणून तो दुसरी विहीर खणू पाहत नाही. सर्वसामान्य माणूस गतानुगतिक असतो. तो धोपटमार्ग सोडायला तयार नसतो. जो धोपटमार्ग सोडतो त्यालाच यश मिळते. सुरुवातीला लोक त्याला वेडे समजतात व त्याची टिंगल पण रुढी मोडणारा हाच खरा पुरुषश्रेष्ठ असतो. अनेक लोक सतत तक्रार करतात, की "मजजवळ खूप गुण आहेत पण काय करू? मला संधीच मिळत नाही.” पण वस्तुस्थिती अशी असते की संधी त्याच्या पायाजवळच असते. दरवाजा ओलांडण्याने, एक पाऊल टाकले की; संधी तेथे घुटमळत असते. पण, हे त्याला समजत नाही. अशी संधी पकडणाऱ्या अनेक पुरुषश्रेष्ठींची उदाहरणे या पुस्तकात दिली आहेत. ती उदाहरणेच संधी कशी पकडायची हे तुम्हाला शिकवतील. या एकविसाव्या शतकात सामाजिक प्रगतीला फारच वेग आला आहे. आपल्या देशातच श्रमणारे दोनशे कोटी हात आहेत. सर्वत्र संधीच कामे तरुणांची वाट पाहात आहेत. मग तुम्हाला मागे कोण खेचत आहे? तुमच्या अंगात मुरलेला आळशीपणाचा दुर्गुणच तुम्हाला मागे खेचतो. तुम्हाला जे मिळाले असेल ते काम कितीही छोटे असले, तरी तुम्ही ते मन लावून केल्यास त्यातूनच तुम्हाला महान संधी मिळू शकेल. या जगात प्रत्येक गोष्टीची किंमत मोजावी लागते. ती किंमत परिश्रमाच्या किंवा त्यागाच्या रूपात द्यावी लागते. असे केल्यासच तुम्हाला हवी असलेली संधी तमच्या पायाशी चालन येईल.
Piracy-free
Piracy-free
Assured Quality
Assured Quality
Secure Transactions
Secure Transactions
Fast Delivery
Fast Delivery
Sustainably Printed
Sustainably Printed
downArrow

Details