लग्न झालं तेव्हा प्राणेशाचार्य सोळा वर्षांचे बायको भागीरथी बारा वर्षांची. तशी ती जन्मापासून आजारीच. पण संन्यस्त वृत्तीने जगावे ही लहानपणापासूनची खुमखुमी. किती सरळ मायाळू रूपवान उंचापुरा तेजस्वी माणूस; पण बिचाNयाला स्त्रीसुख म्हणजे काय चीज आहे याची कल्पनाही नाही. एकटाच झोपतो ओंडक्यासारखा. शरीर जर्जर झाल्यानंतर काम सोडून जातो; परंतु करुणा? आचार्यांना वाटलं कामापेक्षा करुणा कितीतरी मोठी शक्ती. अशी करुणा आपल्यात नसती तर लग्नापासून अंथरूण धरलेल्या बायकोची अशी सेवा केली असती का? एखाद्या परस्त्रीच्या आहारी गेलो नसतो का?
Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.