*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹190
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
भारतीय इतिहास संस्कृती व परंपराविषयक संदर्भ-साधनांचे ज्येष्ठ संकलक वा. ल. मंजूळ यांनी चितारलेल्या ‘संतश्रेष्ठ ज्ञानदेव जीवन आणि कार्य’ या चरित्राने संतसाहित्याच्या अभ्यासामध्ये नव्याने भर पडली आहे. संत ज्ञानदेवांच्या आयुष्यातील चमत्कारिक घटना-प्रसंग यांचा सश्रद्ध चिकित्सेद्वारे अभ्यास करण्याची गरज लेखकाने यातून सूचित केली आहे. ‘ज्ञानेश्वरी’ ‘अमृतानुभव’ ‘चांगदेवपासष्टी’ ‘हरिपाठ’ आणि संकीर्ण अभंग या ज्ञानदेवांच्या सर्वपरिचित साहित्यसंपदेबरोबर ‘ज्ञानदेव’ अशी नाममुद्रा असलेल्या अन्य ४५ रचनांचा तपशील यामध्ये सादर केला आहे. ज्ञानदेवांच्या चरित्रावरील सोळा इंग्रजी ग्रंथ उपलब्ध आहेत. याशिवाय त्यांच्या साहित्याचा काही विदेशी अभ्यासकांनी अभ्यास केला आहे. त्यांचा परिचय स्वतंत्र प्रकरणाद्वारे पुस्तकात दिला आहे. संतश्रेष्ठ ज्ञानदेवांनी शैव-वैष्णव संप्रदायाचा संगम जुळवून आणला. त्यातून कोणती स्थित्यंतरे झाली याचे आणि पालखी सोहळ्याचे यथार्थ वर्णन यामध्ये आहे. ज्ञानदेवांच्या चरित्रविषयक प्रकाशित-अप्रकाशित तसेच मराठी संस्कृतबरोबरच देशी-विदेशी भाषांतील संदर्भसाहित्याचे दालन वा. ल. मंजूळ यांनी याद्वारे आपल्या पुढे खुले केले आहे.