1857 सालच्या स्वातंत्र्यसंग्रामापासून 1971च्या युद्धापर्यंत देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या सर्व सर्वधर्मीय शूरवीरांची आठवण सर्वांना खास करून नवीन पिढीला करून देणे आवश्यक आहे असे वाटते. आपल्या देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात छोट्या-छोट्या गटांनीही काही क्रांतिकारी कृत्ये केली. त्यांपैकी एक म्हणजे काकोरी स्टेशनजवळ ट्रेनवर दरोडा घालून सरकारी खजिन्याची केलेली लूट. ह्या कटात सामील झाले होते पं. रामप्रसाद बिस्मिल अश्फाकउल्ला खाँ चंद्रशेखर आजाद ह्यांच्यासारखे तरुण. ह्यांपैकी चंद्रशेखर आझाद यांची माहिती बऱ्याच जणांना आहे तेवढी पं. रामप्रसाद बिस्मिल व अश्फाकउल्ला खाँ यांची मात्र नाही.रुपेरी पडद्यावर काल्पनिक नायकांची नकली हाणामारीची दृश्ये बघण्यापेक्षा या वीरांची कहाणी येणे आवश्यक आहे. ती उणीव निदान पुस्तकरूपाने तरी प्रसिद्ध व्हावी यासाठी केलेली ही धडपड !
Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.