'सत्यं शिवं सुन्दरम्' ही उक्ती भारतात कशी आली व प्रतिष्ठा पावली याचा हा एक आढावा आहे. हे संशोधन नव्हे. कारण यात या उक्तीच्या अंतर्गत असलेल्या तत्त्वज्ञानविषयक आणि सौंदर्यशास्त्रविषयक कल्पनांची मीमांसा मी केलेली नाही फक्त या उक्तीच्या मागे जो एक भ्रम पसरलेला आहे त्याचे निरसन करण्याचा हा एक प्रयत्न आहे.