*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹407
₹450
9% OFF
Hardback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
घरगुती औषधोपचार हा भारतीय कुटुंबव्यवस्थेचा व जीवनशैलीचाच एक भाग आहे. विश्वासाचा परंपरागत आपला आजीबाईचा बटवा आजही याद्वारे जपला जात आहे. सर्वसामान्य आजारांसाठी महागडी औषधं घेण्यापेक्षा साध्या साध्या उपायांनी घरच्या घरी कसा आराम पडू शकतो याविषयीच्या उपयुक्त माहितीने हे पुस्तक परिपूर्ण आहे. विशेषतः स्वयंपाक घरात नियमितपणे वापरले जाणारे अन्नघटक गृहिणींनी डोळसपणे व वैज्ञानिक दृष्टीने कसे वापरावेत हे या पुस्तकात सांगितलेले आहे. प्रत्येक कुटुंबातील गृहिणीने स्वत: घरचा वैद्य बनून आहार हेच औषध या सूत्रानुसार घरगुती औषधोपचार उपयोगात आणले तर कौटुंबिक आरोग्य निश्चितपणे सुधारेल. सर्व मनुष्यामध्ये निसर्गत:च असलेल्या वैद्यांशाला थोडे आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण देण्याचा प्रयत्न म्हणजे हे पुस्तक होय. आजच्या आधुनिक युगातील व्यक्तीची व रुग्णांची परिस्थिती लक्षात घेऊनच विविध घरगुती औषधोपचारांची मांडणी प्रस्तुत पुस्तकामध्ये अगदी साध्या-सोप्या भाषेत केलेली आहे. स्वस्थवृत्त प्रतिबंधात्मक व सामाजिक आरोग्यशास्त्र आहारशास्त्र पोषणशास्त्र भौतिकी चिकित्सा निसर्गोपचार आयुर्वेद अशा सर्वच आरोग्यशाखेतील तज्ज्ञांच्या दृष्टीने अध्ययन व अध्यापनासाठी तसेच चिकित्सा व आरोग्यरक्षणार्थ हे पुस्तक निश्चितपणे उपयोगी आहे. या पुस्तकातून आपणास नक्कीच ज्ञान आरोग्य व उपचारसंपन्नता मिळेल. उत्तम आरोग्य टिकवण्यासाठी आणि साधे साधे आजार घरच्या घरी सहजपणे बरे करण्यासाठी तुम्हा आम्हा सर्वांनाच हे पुस्तक निश्चितपणे उपयोगी पडेल.