पुस्तक परिचय:पाणी ऑक्सिजन आणि अन्ना नंतर पैसा हा जगातील सर्वात महत्त्वाची वस्तू आहे. पण तरीदेखील बहुतांश लोक त्यांच्या पैशाच्या नियोजनाला पुरेसा वेळ देत नाही. शालेय जीवनामध्ये आणि उच्च शिक्षणामध्ये जवळपास अठरा ते वीस वर्ष घालवल्यानंतर देखील आपल्याला आर्थिक साक्षरता आपल्या जीवनामध्ये किती महत्त्वाची आहे हे कोणी शिकवलं नाही. लेखक नितीन घाडगे आणि धनश्री सगरे यांनी या पुस्तकांमध्ये आर्थिक स्वातंत्र्य साध्या आणि सोप्या पद्धतीने कसे मिळवायचे हे दिले आहे. बऱ्याच व्यक्ती त्यांच्या आर्थिक जीवनामध्ये अयशस्वी का होतात याची प्रमुख कारणे देखील या पुस्तकामध्ये दिली आहेत. श्रीमंत होण्यासाठी एका विशिष्ट मानसिकतेची गरज आहे ही मानसिकता कशा पद्धतीने विकसित करायची याचे उत्तर या पुस्तकात तुम्हाला मिळेल. बऱ्याच व्यक्ती गुंतवणूक करण्यापूर्वी कोणत्याच प्रकारचं आर्थिक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवत नाही. त्यामुळे त्या व्यक्ती त्यांच्या आयुष्यामध्ये दीर्घकालीन संपत्ती बिलकूल मिळवू शकत नाही. लेखकांनी आर्थिक नियोजन करून एक सर्वसामान्य व्यक्ती देखील कशा पद्धतीने संपत्ती निर्मिती करू शकते याचे रहस्य या पुस्तकात दिले आहे.लेखका विषयी थोडे:नितीन घाडगे हे भारतातील काही अग्रगण्य आर्थिक प्रशिक्षकांमध्ये त्यांचे नाव गणले जाते. पैशाचे योग्य पद्धतीने नियोजन करून तुम्ही आर्थिक स्वातंत्र्य कसे मिळवू शकता हे साध्या आणि सोप्या भाषेमध्ये त्यांच्या कार्यशाळेमध्ये सांगतात.धनश्री सगरे एक उत्तम कर तज्ञ असल्याकारणाने बऱ्याच व्यक्ती त्यांना गुंतवणूक कोठे करावे आणि कर कसा वाचवावा हे सतत विचारत असत. आज धनश्री सगरे मॅडम यांचे नाव देखील महाराष्ट्रातील काही मोजक्याच आर्थिक तज्ज्ञांमध्ये गणले जाते.