भगतसिंग म्हटले की सर्वसामान्यपणे मनात येते ती हसत हसत फासावर जाणाऱ्या तेजस्वी क्रांतिकारकाची प्रतिमा... पण भगतसिंग म्हणजे केवळ तेवढेच नाही. भगतसिंग म्हणजे... ...सशस्त्र क्रांतीला वैचारिक अधिष्ठान देणारा राजकीय विचारवंत ...जाणीवपूर्वक हौतात्म्य स्वीकारून भारताच्या स्वातंत्र्य चळवळीची माहिती आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवणारा वीर ...'सांप्रदायिक दंगे और उनका इलाज' 'अछूत समस्या' 'मैं नास्तिक कयों हूँ?' आदी विषयांवर मूलभूत विचार मांडणारा सुधारक ...आर्थिक सामाजिक आणि राजकीय समता असलेल्या अखंड भारताच्या निर्मितीच्या दिशा दाखवणारा मार्गदर्शक ...जगाची रचना नव्याने करू पाहणाऱ्या विचारी आणि उत्साही तरुणांचे प्रेरणास्थान भगतसिंग आजही तितकेच संयुक्तिक आहेत. कारण आजही... राष्ट्र गुलाम नसले तरी कर्ज त्यासाठीच्या अटी आणि व्यापार यांच्याद्वारे राष्ट्राचे शोषण होताना दिसते आहे. नैसर्गिक स्रोतांवरील स्थानिकांचा अधिकार डावलून सरकारी मर्जीतील भांडवलदारांना ते मातीमोल किमतीत विकले जातात. विशिष्ट वर्गाचे हितसंबंध सुरक्षित करण्यासाठी धर्माच्या नावे विद्वेषाचे वातावरण निर्माण केले जाते. गरिबांच्या उत्थानाचे साधन असलेल्या शिक्षणाचे व्यापारीकरण करून त्यांना त्यापासून वंचित केले जाते. त्यामुळे आजही नवीन क्रांतीसाठी प्रेरणा देणारे भगतसिंगांचे विचार जिवंत आहेत. भगतसिंगांच्या क्रांतिकार्यासोबतच त्यांच्या विचारविश्वाचा आढावा घेणारे प्रेरक चरित्र.
Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.