काशीतील घाटांवर एक आंधळा पुजारी एका तरुण स्त्रीला मृत्यू आणि पुनर्जन्माच्या । अनंत चक्रात तिला जखडून ठेवणाऱ्या तिच्या पूर्व जन्माचा स्वीकार करण्यास मदत करतो. तिला आठवणाऱ्या पूर्वजन्मात ती शकुंतला होती-चैतन्यमयी चांगली कल्पनाशक्ती असलेली आणि धाडसी पण पौराणिक शकुंतलेप्रमाणेच तिच्या नशीबात शिदेखील परित्यक्तेचं जिणं लिहिलं होतं. शकुंतला जेव्हा पहिल्यांदा घरातून पळून जाते तेव्हा ती एका स्त्रीबरोबर एका गुहेत आश्रय घेते. ही स्त्री तिला देवीच्या रहस्यांची आणि शक्तीची ओळख करून देते. 'लक्षात ठेव' । शकुंतलेला सांगण्यात येतं 'तिच्या प्रत्येक रूपात देवी स्वामिनीच असते स्वयंसिद्धा असते.' तिच्या आयुयाच्या आचर्यचकित करून टाकणाऱ्या वळगांवरून प्रवास करताना ही शिकवण किती मोलाची आहे हे शकुंतलेच्या लक्षात येतं. प्रवासाहून परतताना तिचे पती जेव्हा एक दासी बरोबर घेऊन येतात तेव्हा तिचं मन शंकेने आणि मत्सराने ग्रासून जातं आणि ती यदुरी नावाच्या पतित स्त्रीचं रूप धारण करून गंगेच्या काठावर भेटलेल्या एका ग्रीक प्रवाशाबरोबर जाण्यासाठी आपल्या घराचा आणि कर्तव्याचा त्याग करते. ते दोघे मिळून काशीपर्यंत प्रवास करतात आणि तिथे शकुंतला भोगांच्या आहारी जाते. सर्व कायदे आणि बंधनं झुगारून देऊन उपभोग घेण्याची आपली इच्छा ती पूर्ण करते. पण लवकरच तिचं मन अस्वस्थ होतं आणि या विश्वाचा त्याग करणं देखील तिला भाग पडतं... अभिनव आणि हृदयद्रावक असलेली ही कादंबरी एका स्त्रीच्या विदारक आयुष्याच्या चित्रमय वर्णनाने वाचकाला मोहिनी पाडते. स्वतःच्या इच्छेप्रमाणे जीवन जगण्याची या स्त्रीची इच्छा परिस्थितीमुळे आणि ती ज्या काळात जगत होती त्या काळामुळे प्रत्येक वळणावर निष्फळ झाली आहे. नमिता गोखल यांना प्रभावी कथाकथनाची विलक्षण देणगी आहे. इतिहास धर्म आणि तत्त्वज्ञान यांचा सुमेळ साधून ही कहाणी प्राचीन वातावरणाचा परीघ ओलांडून पलिकडे जाते.